Homeसामाजिकराष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषी यांच्या ऊर्जा चरणांचे वडगांव मावळ येथे आगमन ...

राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषी यांच्या ऊर्जा चरणांचे वडगांव मावळ येथे आगमन पालखी मध्ये मिरवणूक आणि पादुका दर्शन सोहळा संपन्न

राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषी यांच्या ऊर्जा चरणांचे वडगांव मावळ येथे आगमन

पालखी मध्ये मिरवणूक आणि पादुका दर्शन सोहळा संपन्न

वडगांव मावळ : राष्ट्रसंत, आचार्य भगवंत, परम पूज्य श्री आनंद ऋषीजी महाराज साहेब या युगपुरुषांच्या भारतामधील पहिल्या १४ शुभ चिन्ह असलेल्या ऊर्जा चरण पादुकांचे दर्शन आणि जाप शुक्रवार दि. ११ जुलै २०२५ रोजी जैन स्थानक , बाजारपेठ , वडगांव मावळ येथे संपन्न झाला ज्यामध्ये अनेक नागरिकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

त्रिशूळ, अंकुश, त्रिकोण, मत्स्य  नक्षत्र, ध्वज, उर्ध्व रेखा, डमरू, पर्वत, पद्, स्वस्तिक, देवज्ञ रेखा, मंदिर, पालखी या १४ शुभ चिन्हांचा समावेश आचार्य भगवंत परम पूज्य श्री आनंद ऋषीजी म. सा. यांच्या चरणांवर होता याच १४ शुभ चिन्हांच्या ऊर्जा चरणांची वडगांव मावळ येथे जयघोषांमध्ये पालखीमधून मिरवणूक संपन्न झाली त्यानंतर जैन स्थानकामध्ये हे ऊर्जा चरण दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

श्री जैन स्थानकवासी श्रावक संघाचे अध्यक्ष सुभाषचंद्र मुथा, डॉ.सुनील बाफना, प्रेमराज बाफना, राजेश बाफना, अशोकलाल गुजराणी, सुरेंद्र एस बाफना, झुंबरलाल कर्नावट, विजय बलदोटा, मोतीलाल बाफना, कांतीलाल बाफना, दिलीप मुथा, अमोल बाफना, रोहन मुथा, मनोज बाफना, रमेश गुजराणी, अमित मुथा, प्रतीक सुराणा, राजेंद्र जैन, साहिल बाफना, सुवालाल कुंकूलोळ, गौरव बलदोटा, सहज बाफना, आदी मान्यवर  महिला मंडळ युथ ग्रुप आणि पाठशाळा ग्रुप चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते

आनंद दरबार, दत्तनगर, पुणे चे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांचा वडगांव श्री संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला. उमेद बलदोटा, पंकज बाफना, सुनील चोरडिया, नितीन देसरडा यावेळी उपस्थित होते.

ज्यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम संपन्न होत आहे त्या आनंद दरबार, दत्तनगर, पुणे येथील अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी प्रास्ताविक केले ज्यात त्यांनी या संपूर्ण उपक्रमाची माहिती दिली.

स्वागतगीत झुंबरलाल कर्नावट आणि प्रीती बाफना यांनी केले.

सूत्रसंचालन मा.नगरसेवक भूषण मुथा यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेश बाफना यांनी केले.

शुक्रवार १८ जुलै २०२५ रोजी आनंद दरबार, दत्तनगर, पुणे येथे या ऊर्जा चरणांची स्थापना होणार असून त्यानिमित्ताने गौतमप्रसादी वडगांव जैन स्थानकवासी श्रावक संघाचे वतीने संपन्न होणार आहे.

जैन स्थानकवासी श्रावक संघ,

युथ ग्रुप, महिला मंडळ, पाठशाळा ग्रुप, वडगांव मावळ यांनी नियोजन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!