Homeक्राईमलोणावळ्यात भर रस्त्यात दारूच्या नशेत पर्यटक महिलांचा धिंगाणा

लोणावळ्यात भर रस्त्यात दारूच्या नशेत पर्यटक महिलांचा धिंगाणा

लोणावळ्यात भर रस्त्यात दारूच्या नशेत पर्यटक महिलांचा धिंगाणा

लोनावळा : शहरामध्ये फिरायला व वाढदिवस साजरा करायला आल्यानंतर एका ग्रुपमधील काही महिलांमध्ये भांडणे झाली. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळा वाहतूक शाखेच्या पोलीस चौकी समोरच ही भांडणे चालू होती यामुळे अक्षरशा मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. अश्लील शिवीगाळ व एकमेकाला या महिला मारहाण करत होत्या.

त्याच्या सोबत असलेल्या पुरुषांना देखील शिवीगाळ व मारहाण त्या करत होत्या. सुमारे तासभर लोणावळ्यातील मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांच्या समोरच हा राडा सुरू होता. महिला असल्यामुळे पुरुष पोलीस देखील यामध्ये फारसे हस्तक्षेप करत नव्हते अखेर लोणावळा शहर पोलीस स्टेशन मधून महिला पोलिसांना बोलवण्यात आले व त्यानंतर या सर्व महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

प्राप्त माहितीनुसार सदरील महिला व पुरुष ग्रुप हा पुण्यातील निगडी येथील होता. त्या महिला नशेत होत्या व सर्व एकाच ग्रुप मध्ये होत्या व त्यांच्यात अचानक भांडणे झाली. सुरुवातीला शिवीगाळ सुरू झाली व नंतर त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. हा सर्व प्रकार मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर मुख्य चौकात व वाहतूक पोलीस चौकी समोर सुरू होता.

पोलिसांनी व स्थानिक नागरिकांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस आमच्या खिशात आहेत असे म्हणत त्या मोठ मोठ्याने आरडाओरडा करत होत्या. पोलिसांचे देखील त्या ऐकत नव्हत्या. सुमारे तासभर हा प्रकार सुरू होता. नशेमध्ये असणाऱ्या या महिलांची हाणामारी पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!