Homeमहत्त्वाचेवडगांव नगरपंचायतीच्या वतीने हर घर तिरंगा हर घर स्वच्छता अभियाना अंतर्गत राबविण्यात...

वडगांव नगरपंचायतीच्या वतीने हर घर तिरंगा हर घर स्वच्छता अभियाना अंतर्गत राबविण्यात आलेले विविध उपक्रम

वडगांव नगरपंचायतीच्या वतीने हर घर तिरंगा हर घर स्वच्छता अभियाना अंतर्गत राबविण्यात आलेले विविध उपक्रम

वडगांव मावळ : वडगाव नगरपंचायत वडगाव यांच्यावतीने मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. प्रविण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली “हर घर तिरंगा *हर घर स्वच्छता” या अभियानांतर्गत शहरात विविध जनजागृती पर उपक्रम राबविण्यात आलेले आहेत, उपक्रमांचा दिनांकानुसार तपशील पुढील प्रमाणे.

 ६ ऑगस्ट २०२५:- न्यू इंग्लिश स्कूल वडगाव मावळ या शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी स्वच्छता शपथ व तिरंगा शपथ घेतली त्यामध्ये सुमारे 1450 विद्यार्थी सहभागी होते

७ ऑगस्ट २०२५:- शहरातील न्यू इंग्लिश स्कूल, रमेश कुमार सहानी स्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल, सर्व जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी जाऊन त्यांना अभियानात सहभागी होण्याकरिता माहिती देण्यात आली व पुढील उपक्रमांचे नियोजन करण्यात आले. पर्यावरण पूरक तिरंगा राखी स्पर्धा, तिरंगा रांगोळी व चित्रकला स्पर्धा, तिरंगा प्रश्नमंजुषा, तिरंगा दोड, पथनाट्य, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, भारतीय जवानांच्या साठी पत्र लेखन, तिरंगा सेल्फी आद.

७ ऑगस्ट २०२५- न्यू इंग्लिश स्कूल रयत शिक्षण संस्था या ठिकाणी पर्यावरण पूरक राखी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सुमारे 150 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.

८ ऑगस्ट २०२५ – न्यू इंग्लिश स्कूल येथे तिरंगा चित्रकला स्पर्धेचा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सुमारे 250 विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच नगरपंचायत कार्यालय या ठिकाणी तिरंगा सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला या ठिकाणी 150 नागरिक व कर्मचाऱ्यांनी सेल्फी घेतला

११ ऑगस्ट २०२५ – शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयाने येथे विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजाची वाटप करण्यात आले 500 तिरंगा झेंडे वाटप करण्यात आले

१२ ऑगस्ट २०२५ – जिल्हा परिषद शाळा केशवनगर, न्यू इंग्लिश स्कूल त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजाचा प्रवास याबाबत लघु चित्रपट दाखवून त्यावरती प्रश्नमंजुषा चे आयोजन करण्यात आले यामध्ये सुमारे 1800 विद्यार्थी सहभागी होते. तसेच जिल्हा परिषद शाळा केशवनगर या ठिकाणी तिरंगा राखी बनवणे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती सदर स्पर्धेमध्ये सुमारे 100 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

१३ ऑगस्ट २०२५ जिल्हा परिषद शाळा पंचायत समिती या शाळेचे तिरंगा प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते या फेरीमध्ये सुमारे 250 विद्यार्थी सहभागी होते. व शहरातील नागरिकांना राष्ट्रध्वज तिरंगा चे मोफत वाटप करण्यात येत आहे व नागरिकांमध्ये तिरंगा ध्वज फडकवणे व अभियानाची जनजागृती करण्यात येत आहे

१४ ऑगस्ट २०२५:- वडगाव नगरपंचायत मार्फत शहरातून भव्य मोटरसायकल तिरंगा रॅली काढण्यात आली यामध्ये शहरातील 150 नागरिक व कर्मचारी उपस्थित होते सदर रॅली नगरपंचायत पासून चालू होऊन बाजारपेठ, केशवनगर, माळस्करवाडी, संभाजीनगर, डेक्कन हिल माळीनगर या ठिकाणाहून काढण्यात आली. तसेच न्यू इंग्लिश स्कूल यांच्यामार्फत शहरातून मेन बाजारपेठेत तिरंगा प्रदर्शन रॅली काढण्यात आली यामध्ये सुमारे 1000 विद्यार्थी सहभागी होते. व पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा अशा प्रकारे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 7:45 वा नगरपंचायत प्रांगणात ध्वजारोहण होणार होणार आहे स्वतंत्र सैनिक व वीरांचा सन्मान करण्यात येणार आहे व तसेच शहरात एलईडी स्क्रीन द्वारे शहरात हर घर तिरंगा हर घर स्वच्छता अभियान जागृती करण्यात येणार आहे व शहरातून भव्य तिरंगा रॅलीचे व शहरात पथनाट्याचे आयोजन करण्यात आलेले आहे सदर उपक्रमांमध्ये शहरातील विद्यार्थी नागरिक कर्मचारी महिला बचत गट विविध स्वयंसेवी संस्था यांचा उत्कृष्ट सहभाग लाभला आहे व उर्वरित कार्यक्रमांच्या नियोजनामध्ये सर्वांना सहभागी करून घेण्यात आलेले आहे

वरील नमूद केलेल्या उपक्रमांमध्ये आत्तापर्यंत वडगाव शहरातील सुमारे 5500 विद्यार्थी व नागरिक यांनी सहभाग नोंदविला.

डॉ प्रविण निकम मुख्याधिकारी तथा प्रशासक वडगाव नगरपंचायत वडगाव यांनी शहरातील नागरिकांना हरघर तिरंगा – हर घर स्वच्छता या अभियानामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!