Homeताज्या बातम्यावडगाव कातवी नगरपंचायत निवडणूक 2025 — राष्ट्रवादीच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ रविवारी

वडगाव कातवी नगरपंचायत निवडणूक 2025 — राष्ट्रवादीच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ रविवारी

वडगाव मावळ|वडगाव कातवी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक पदाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ रविवारी (दि. 23 नोव्हेंबर 2025) सकाळी होणार आहे. या प्रचाराची सुरुवात आमदार सुनिल ‘आण्णा’ शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत पायी पदयात्रेने करण्यात येणार असून, खंडोबा मंदिर ते ग्रामदैवत पोटोबा महाराज मंदिर असा उत्साहपूर्ण मार्ग असेल.

प्रचार शुभारंभाच्या निमित्ताने खंडोबा मंदिर चौक, वडगाव मावळ येथे सकाळी ठिक 9.00 वाजता सर्व जमा होतील. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे, फलक, बॅनर आणि घोषणांनी गजबजलेल्या पदयात्रेला सुरुवात होऊन सर्व उमेदवारांची जनतेशी थेट भेट घडवून आणली जाणार आहे.

या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सेलचे आजी-माजी अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच हितचिंतक मित्रपरिवार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निवडणुकीच्या तोंडावर होणारी ही पदयात्रा कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण करणार असून, वडगाव मावळातील निवडणुकीचे वातावरण आणखी रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पदयात्रेदरम्यान उमेदवारांचा परिचय, पक्षाची भूमिका, विकासाची दिशा आणि भावी आराखडे यावर जनतेशी संवाद साधून प्रचाराची अधिकृत सुरुवात केली जाईल. पक्षाच्या दृष्टीने हा प्रचारशुभारंभ आगामी निवडणूक लढतीला बळकटी देणारा ठरणार आहे, असा विश्वास वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!