वडगाव स्मशानभूमित स्वच्छतेचा अभाव, निवारा शेडचे काम लवकर पूर्ण करा – वडगाव भाजपा ची मागणी
वडगांव मावळ :- वडगांव नगरपंचायत येथील वैकुंठ स्मशानभुमी येथील निवारा शेडची दुरूस्ती उन्हाळयामध्ये करणे अपेक्षित होते तरी ते काम ऐन पावसाळयात संत गतीने सुरु आहे. सदर स्मशानभुमीमध्ये, अंत्यविधी व दशक्रिया विधिसाठी येणा-या नागरिकांना झालेल्या दुर्गंधी मुळे नाहक त्रास होत आहे. तरी आपण सदर काम त्वरीत पुर्ण करावे व नागरिकांची गैरसोय टाळावी.
तसेच सदर स्मशानभुमीमध्ये वेळेच्या वेळी स्वच्छता होत नाही सध्या पावसाचे प्रमाण असल्यामुळे शेवाळ झाले असुन तेथुन ज्येष्ठ नागरिक, व महिला त्यावरून घसरून पडलेले आहे त्यामुळे अनेकांना दुखापत देखील झालेली आहे. तरी पावसामुळे झालेले शेवाळ घालविण्यासाठी ब्लीचिंग पावडरची फवारणी करावी, तसेच दशक्रिया विधी च्या वेळी सभामंडप शेजारीअसलेल्या कचरा गांड्यांचा दुर्गंधी युक्त वास प्रवचन सेवा आयकताना येत असतो, त्यामुळे तेथील कचरा डेपो गाड्या कायम स्वरूपी हलविण्यात याव्यात व इतर उपाययोजना करण्यात याव्यात.
तसेच स्मशानभुमीतील दहन शेडला चिमणी बसवून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आजुबाजुच्या लोकांना त्रास होणार नाही. तसेच स्मशानभुमीमध्ये व परिसरामध्ये पुरेशी लाईट व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे.
स्मशानभुमी व पंचमुखी मारूती मंदिरा समोरीतल रस्त्यावरील बेकायदेशीर पार्किंग त्वरीत हाटविण्यात यावी. त्यामुळे स्मशानभुमीत येणा-या लोकांची गैरसोय होणार नाही. लवकरात लवकर वरील सर्व उपाययोजना झाले नाही तर वडगाव भाजपा नगर पंचायत प्रशासना विरोधात आंदोलन करेल, असा इशारा भाजपा शहर अध्यक्ष संभाजी म्हाळसकर यांनी दिला आहे, यावेळी मा सभापती गुलाबराव म्हाळसकर, मा अध्यक्ष अनंता कुडे, युवक अध्यक्ष अतिश ढोरे, पवन दंडेल, शेखर वाहिले आदिजन उपस्थित होते




















