वडगांव मावळ: वाहतूक पोलिसाच्या खुनातील २ आरोपींना मावळ न्यायालयाने १९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे वडगाव कर्तव्यावर असलेल्या मिथुन वसंत धेंडे ( वय ४५.रा उरुळी कांचन सध्या वडगाव पोलीस स्टेशन) या वाहतूक पोलिसाला मंगळवार दिनांक १३ मे २०२५ रोजी रात्री ९:४० वाजता वडगाव फाटा येथे भरधाव कंटेनर ने चिरडून त्यांचा खून केल्याची घटना घडली होती.
कंटेनर चालक व क्लीनर वर खुनाचा गुन्हा दाखल केला असून मावळ न्यायालयाने दोन्ही आरोपींना १९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रोहन इसब खान (वय २४ राहणार सिंगार पुनाना हिदाना जिल्हा मेवात हरियाणा) उमर दिन मोहम्मद(वय १९ राहणार बरसाना मथुरा उत्तर प्रदेश) असे पोलीस हवालदाराचा खून केलेल्या चालक व क्लीनर आरोपींची नावे आहेत.
वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई बाजूकडून चाकण कडे जाणारा भरधाव HR 74B 3677 या क्रमांकाचा कंटेनर चालक रोहन इसब खान याने कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला जाणून बुजून चिरडून त्यांचा खून केला. कंटेनर चालक चाकणच्या बाजूने वेगाने निघून गेला. कंटेनर चालक हा कार्ला फाटा मावळ येथून धोकादायक भरधाव वेगाने वाहन चालवत असताना एका तरुणाने त्याचा व्हिडिओ काढला व पोलिसांना माहिती दिली की सदरील कंटेनर हा धोकादायक पद्धतीने भरधाव वेगाने येत आहे.
पुणे ग्रामीण कंट्रोल वरून कंटेनर थांबवण्याचे आदेश आल्याने. वडगाव फाटा येथे कंटेनर थांबवत असताना कंटेनर थांबवत आहे असे दाखवून भरधाव कंटेनर वेगाने हालचाल करून पोलिस मिथुन धेंडे यांना सदरील कंटेनर ने चिरडले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातानंतर काही तासातच कंटेनर जप्त करून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आरोपी हे नशेच्या आहारी असल्याचे दिसून आले. वडगाव मावळ न्यायालयात बुधवार दिनांक १४मे रोजी दुपारी त्यांना हजर केले असता पोलिस गुन्हाचा सखोल तपास करण्यासाठी आरोपींना दिनांक १९मे पर्यंत पोलीस कोठडी मध्ये ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पोलीस हवालदार मिथुन धेंडे यांच्यावर उरुळी कांचन पुणे येथे बुधवार दिनांक १४मे सकाळी साडेअकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे. पोलीस निरीक्षक कुमार कदम यांसह अनेक पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिथुन धेंडे यांच्या पक्षात पत्नी, दोन, मुले, आई, भाऊ असा परिवार आहे. मितभाषी मनमिळावू स्वभावाचे म्हणून मिथुन धेंडे परिचित होते लोणावळा कामशेत वडगाव मावळ या पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी कर्तव्य बजावले होते.
धेंडे यांच्या कुटुंबाचा आधार गेला असून त्यांच्या पत्नीला पोलीस प्रशासनाने त्वरित नोकरी द्यावी तसेच त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी. मिथुन धेंडे यांच्या मृत्यूने पुणे ग्रामीण पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे कर्तव्यदक्ष मनमिळावू पोलीस असल्याने मिथुन धेंडे यांचा सर्वसामान्य नागरिकांसोबत दांडगा जनसंपर्क होता. सदरील गुन्ह्याचा तपास वडगाव मावळ पोलीस करत आहे.
गणेश नामदेव भेगडे




















