Homeमहत्त्वाचेशेतकऱ्यांना पिक संरक्षण कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आमदार सुनील शेळके यांचे आवाहन

शेतकऱ्यांना पिक संरक्षण कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आमदार सुनील शेळके यांचे आवाहन

शेतकऱ्यांना पिक संरक्षण कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आमदार सुनील शेळके यांचे आवाहन

मावळ प्रतिनिधी :

मावळ तालुक्यातील शेतकरी यंदा मोठ्या संकटाला सामोरे जात आहेत. तालुक्यातील सुमारे ७ ते ८ हजार एकर क्षेत्रावर यंदा भात लागवड झाली असली, तरी भात पिकावर तांबा व करपा या रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तातडीची योजना राबविण्यात येत आहे. सोमवार, दि. १५ सप्टेंबर २०२५ पासून “पिक संरक्षण कर्ज योजने” अंतर्गत प्रत्येक भात उत्पादक शेतकऱ्यास औषध फवारणीसाठी १०,००० रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. योजनेत आतापर्यंत केवळ ४८३ शेतकऱ्यांनी नावनोंदणी केली असून, उर्वरित सर्व शेतकऱ्यांनीही यात सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आमदार सुनील शेळके यांनी या संदर्भात सांगितले की,

> “भात पिकावर आलेल्या तांबा आणि करपा या रोगांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भीती न बाळगता सर्व शेतकरी बांधवांनी त्वरित पिक संरक्षण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा. आपल्या शिवारावर किडनाशक फवारणी करून पिकाचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे.”

त्यांनी पुढे महसूल व कृषी विभागातील अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांमध्ये जनजागृती वाढविण्यासह योग्य मार्गदर्शन करण्याचे निर्देश दिले.

दरम्यान, औषध फवारणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने आमदार शेळके यांनी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याकडे ड्रोनद्वारे औषध फवारणी सेवा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याची मागणीही केली आहे. त्यामुळे कमी वेळेत, कमी श्रमात व समप्रमाणात फवारणी करून रोग नियंत्रण अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.

आमदार शेळके यांनी शेवटी स्पष्ट केले की,

> “पिक संरक्षण कर्ज योजनेचा उत्स्फूर्त लाभ घेऊन आपल्या पिकाचे रक्षण करावे. शासन, बँक आणि स्थानिक प्रशासन या सर्व यंत्रणांकडून शेतकऱ्यांना मदत मिळत आहे. त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याचे पीक वाया जाणार नाही, याची काळजी आपण सर्वांनी मिळून घ्यायची आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!