संततधार पावसाने पवना धरण १०० टक्के भरले.४३०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू. शाखा अभियंता रजनीश बारिया यांची माहिती
पवना नगर : मावळ तालुक्यातील अनेक गावांना व पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने पवना धरण १०० टक्के भरले आहे. धरणातून ४३००क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती पवना धरण शाखा अभियंता रजनीश बारिया यांनी दिली आहे.
मागील दोन-तीन दिवसापासून लोणावळा व मावळ तालुक्यातील घाटमाथा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मावळ तालुक्यातील सर्वात मोठे धरण असलेले पवना धरण हे पूर्ण क्षमतेने भरले असून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पवना नदीमध्ये हे पाणी सोडण्यात आले असून नदीकिनाऱ्यावर राहणारे नागरिक व परिसरातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी.
नदीपात्रात वेगाने पाणी वाहत असल्यामुळे कोणीही पाण्याच्या पात्रामध्ये उतरण्याचा प्रयत्न करू नये, आपली जनावरे पाण्याच्या दिशेने जाणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















