Homeसामाजिकसरसेनापती सांस्कृतिक महोत्सव” तळेगाव दाभाडे येथे : स्थानिक कलाकारांसाठी हक्काचे व्यासपीठ

सरसेनापती सांस्कृतिक महोत्सव” तळेगाव दाभाडे येथे : स्थानिक कलाकारांसाठी हक्काचे व्यासपीठ

सरसेनापती सांस्कृतिक महोत्सव” तळेगाव दाभाडे येथे : स्थानिक कलाकारांसाठी हक्काचे व्यासपीठ

तळेगाव दाभाडे:मावळ मुळशी तालुक्याचे पहिले आमदार आणि सर्व मावळवासीयांच्या अभिमानाचे प्रतीक असलेले सरसेनापती विरधवलराजे दाभाडे सरकार यांच्या प्रेरणेतून “सरसेनापती सांस्कृतिक महोत्सव” तळेगाव दाभाडे येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून तळेगाव आणि परिसरातील स्थानिक कलाकारांना आपल्या कला, संस्कृती, आणि परंपरा सादर करण्यासाठी एक हक्काचे, भव्य व्यासपीठ मिळत आहे.

हा सांस्कृतिक महोत्सव शुक्रवार, दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता शिव शंभू तीर्थ मैदान, तळेगाव दाभाडे येथे संपन्न होणार आहे. विविध कलाक्षेत्रात कार्यरत स्थानिक कलावंत या व्यासपीठावरून आपली कला सादर करणार असून, यावेळी प्रेक्षकांना संगीत, नृत्य, नाट्य, लोककला आणि आधुनिक कलारूपांचा सुरेख संगम अनुभवायला मिळणार आहे.

तळेगावातील कलावंताची कलारुपी मानवंदना बघायला अवघे अवघे या!” या संदेशासह आयोजकांनी सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, नवोदित कलावंतांना आपल्या कलाकौशल्याची झलक मोठ्या मंचावर सादर करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे.

या कार्यक्रमाचे निमंत्रक संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील (वस्ताद) असून, त्यांनी सांगितले की, “आपल्या तळेगावात आणि मावळ परिसरात अनेक गुणी कलाकार आहेत. मात्र त्यांना योग्य मंच मिळत नाही. सरसेनापती विरधवलराजे दाभाडे सरकार यांच्या प्रेरणेतून आम्ही हा महोत्सव आयोजित करत आहोत, ज्यामुळे स्थानिक प्रतिभेला चालना मिळेल आणि गावाची सांस्कृतिक ओळख अधिक समृद्ध होईल.

सांस्कृतिक महोत्सवात संगीत, गायन, वादन, पारंपरिक नृत्य, लोकनाट्य, कवितावाचन, चित्रकला आणि आधुनिक कलाप्रदर्शन अशा विविध कलारूपांचा समावेश आहे. कार्यक्रमात स्थानिक शाळा, महाविद्यालये तसेच सामाजिक संस्थांचे सहभाग नोंदवावा.कलाकारांना त्यांच्या कार्यगौरवासाठी सन्मानचिन्हे व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या आयोजनात महेश सोनपावले (संपर्क: ९०४९६९५६३३) आणि सिद्धेश जाधव (संपर्क: ९९२१००४५६३) यांचे विशेष सहकार्य आहे. त्यांनी सांगितले की, “ही केवळ सांस्कृतिक संध्याच नाही, तर तळेगावाच्या कलात्मक आत्म्याचा उत्सव आहे. समाजातील प्रत्येक घटकाने यात सहभागी व्हावे, ही आमची अपेक्षा आहे.”

तळेगाव दाभाडे हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेसाठी ओळखले जाणारे गाव आहे. अशा भूमीत “सरसेनापती सांस्कृतिक महोत्सव” आयोजित होणे ही मावळवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. स्थानिक कलावंतांच्या या कलारुपी मानवंदनेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.

मावळच्या जनतेसाठी हा दिवस म्हणजे संस्कृती, कला आणि परंपरेचा उत्सव ठरणार आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!