Homeक्राईमसराईत घरफोड्या टोळीच्या तपासात १२ घरफोड्याचा पोलिंसानी केला उलगडा

सराईत घरफोड्या टोळीच्या तपासात १२ घरफोड्याचा पोलिंसानी केला उलगडा

सराईत घरफोड्या टोळीच्या तपासात १२ घरफोड्याचा पोलिंसानी केला उलगडा

सोमाटणे (मावळ) : सोमाटणे फाटा येथे मागील महिन्यात पोलिस पथकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत घरफोड्या टोळीचा तपासात मोठा पर्दाफाश झाला असून, या आरोपींकडून तब्बल बारा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने केलेल्या या धाडसी कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

रावेत पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी झालेली मोटार घेऊन संशयित आरोपी हिंजवडीहून सोमाटणे टोल नाक्याकडे येणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार २७ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे सोमाटणे टोल नाक्यावर पोलिसांनी सापळा रचला. संशयित मोटार अडवताच, मोटारीत मागे बसलेल्या एका आरोपीने पोलिसांच्या दिशेने पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस हवालदार भाऊसाहेब राठोड यांनी प्रसंगावधान दाखवत आरोपीच्या हातातील पिस्तूल हिसकावले. झटापटीदरम्यान पिस्तुलातून गोळी सुटून ती मोटारीच्या छताला लागून आरपार गेली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

यानंतर पथकातील इतर पोलिसांनी तातडीने झडप घालत सनीसिंग पापासिंग दुधानी, जलसिंग राजपुतसिंग दुधानी (दोघे रा. रामटेकडी, हडपसर) आणि मनीष बाबुलाल कुशवाह (रा. मध्यप्रदेश) या तिघांना अटक केली. पुढील तपासात चिंचवड, रावेत, हिंजवडी, बाणेर, कोथरूड, वाकड, भोसरी एमआयडीसी, पिंपरी व निगडी परिसरातील बारा घरफोड्यांचा उलगडा झाला. आरोपींकडून २९ लाख ४४ हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केले.

चोरीचा मुद्देमाल खरेदी करणारे किरपानसिंग शितलसिंग दुधानी, शांताराम ऊर्फ संतोष गुरप्पा कांबळे (दोघे रा. कुसगाव, मावळ) व अक्षय राजू चनाल (रा. खंडाळा, मावळ) यांनाही अटक करण्यात आली आहे. सनीसिंगवर ७१ तर जलसिंगवर ५६ गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या कारवाईबद्दल स्थानिक नागरिकांनी पोलिसांचे विशेष कौतुक केले आहे. पोलीस सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. गुन्हेगारांवर कठोर कारवाई होत असल्याने परिसरात सुरक्षिततेची भावना वाढली आहे, अशा सकारात्मक प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!