सूर्यनमस्कार घाला आणि शरीर सुदृढ ठेवा. गोल्डन रोटरी चे अध्यक्ष संतोष परदेशी यांचे प्रतिपादन
तळेगाव दाभाडे : शहरात शनिवार दिनांक १२जून २०२५ रोजी जागतिक योग दिनानिमित्त स्माईल व्यसनमुक्ती केंद्र व रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने स्माईल व्यसनमुक्ती केंद्रातील रुग्णांसाठी ११०० सूर्यनमस्कार घालण्याचा उपक्रम घेण्यात आला.
यावेळी बोलताना रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे चे अध्यक्ष संतोष शांताराम परदेशी म्हणाले की नियमित सूर्यनमस्कार घातल्याने आपले शरीर सुदृढ राहते व शरीर निरोगी राहते यासाठी नियमितपणे सूर्यनमस्कार व योग करावे असे प्रतिपादन परदेशी यांनी केले.
स्माईल व्यसनमुक्ती केंद्रातील १२४ रुग्ण व गोल्डन रोटरीचे सदस्य यांनी एकत्रित येऊन ११०० सूर्यनमस्कार घालून एक वेगळा व अनोखा उपक्रम जागतिक योग दिनानिमित्त प्रस्थापित केला. यावेळी स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक हर्षल पंडित. रोटरीचे सहप्रांतपाल दीपक फल्ले. उपाध्यक्ष प्रशांत ताये. सचिव प्रदीप टेकवडे. दिनेश चिखले. राकेश गरुड. बसप्पा भंडारी.आदी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल बोराटे. स्माईल व्यसनमुक्ती मधील योग शिक्षक अक्षय संडिम, हर्षल जोशी, रोहन यादव, नितीन नाटेकर, आनंद भागवत यांनी ११०० सूर्यनमस्काराचा संकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















