सेंट्रल चौक ते वडगाव फाटा मार्गावर वेश्याव्यवसायाला ऊत
तळेगाव दाभाडे: जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील सेंट्रल चौक. घोरावाडी डोंगर पायथा. सोमाटणे फाटा खिंड. लिंब फाटा. सी आर पी एफ कॅम्प वडगाव फाटा या रस्त्यावर गेल्या दोन ते चार वर्षापासून भर दिवसा वेश्या व्यवसायाला ऊत आला आहे. हा वेश्या व्यवसाय बंद करावा अशी मागणी अनेक नागरिकांनी केली आहे.
सोमाटणे फाटा खिंड, सीआरपीएफ कॅम्प, वडगाव फाटा येथे दररोज वेश्या व्यवसाय करणाऱ्या आठ ते दहा महिला भर रस्त्यावर उभ्या असतात. पुणे मुंबई महामार्गावरील मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर तर तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर अनेक वेश्या रस्त्याच्या कडेला उभ्या असतात.
या महामार्गावरील अनेक लॉज मध्ये वेश्या ग्राहकाला घेऊन जाताना दिसून येत आहे. सेंट्रल चौक ते वडगाव फाटा या ठिकाणी वेश्यांचा वावर दिसून येत आहे. त्यामुळे येथून जाता येताना सर्वसामान्य महिलांची कुचंबना होत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. तरी पोलीस प्रशासनाने याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११




















