Homeमहत्त्वाचेसोमाटणे टोलनाका बंद करण्यासाठी जनआंदोलनाचा इशारा

सोमाटणे टोलनाका बंद करण्यासाठी जनआंदोलनाचा इशारा

सोमाटणे टोलनाका बंद करण्यासाठी जनआंदोलनाचा इशारा

तळेगाव दाभाडे : जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील सोमाटणे टोलनाका बेकायदेशीर असून सन २००८ च्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेतील नियमांचे उल्लंघन करून सोमाटणे टोलनाका सर्रासपणे चालविला जात आहे.या मध्ये अनेकांचे आर्थिक हितसंबंध असल्याने हा टोलनाका बंद करण्याबाबत गेल्या दोन ते तीन वर्षापासून टोलवा टोलवी सुरू आहे.

असा गंभीर आरोप जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक बाळासाहेब जांभुळकर.माजी नगरसेवक अरुण बबनराव माने. माहिती अधिकार कार्यकर्ते जयवंतराव कदम यांनी बुधवार दिनांक १६जुलै २०२५ रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. सोमाटणे टोलनाका तत्काळ बंद न केल्यास येत्या मंगळवार दिनांक २२जुलै २०२५ रोजी सोमाटणे टोलनाक्यावर बेमुदत उपोषण आणि जनआंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

या पत्रकार परिषदेच्या वेळी ज्येष्ठ स्वतंत्र सैनिक बाळासाहेब जांभूळकर, माजी नगरसेवक अरुण माने, माहिती अधिकार कार्यकर्ते जयवंतराव कदम, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाहतूक शाखेचे राज्य उपाध्यक्ष सचिन भांडवलकर, माहिती अधिकार कार्यकर्ते जमीर नालबंद, सामाजिक कार्यकर्ते किशोर कवडे, आदी उपस्थित होते. या संदर्भात बोलताना माजी नगरसेवक अरुण माने म्हणाले की मुख्यमंत्री. सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले असून राजपत्रात स्पष्ट उल्लेख केल्यानुसार दोन टोलनाच्या मधील अंतर हे किमान ६० किलोमीटर असावे लागते.

तसेच नगरपालिकेच्या हद्दीपासून टोलनाका किमान १० किलोमीटर अंतराबाहेर असावा लागतो. त्याप्रमाणे टोल आकारणी आणि प्रवासी सुविधा देणे बंधनकारक असताना सोमाटणे टोलनाका यापैकी कोणत्याही नियमात बसत नाही. तसेच ज्येष्ठ स्वतंत्र सैनिक बाळासाहेब जांभुळकर म्हणाले की सरकारनेच कायदा केला आहे आणि सरकारच तो कायदा मोडत आहे. राज पत्रानुसार सोमाटणे टोल नाका बेकायदेशीर ठरतो. तरीही तो चालविला जातो आहे.

सर्वसामान्य जनतेला वेटीस धरले जात आहे. आपण उपोषणास बसणार असून सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नागरिकांनीही लोकहितासाठी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. अनेक नागरिकांनी देखील या जन आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!