Homeक्राईमसोमाटणे फाट्यावर पिस्तूलतस्करीचा पर्दाफाश:पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई, ४ पिस्टलसह १०.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त

सोमाटणे फाट्यावर पिस्तूलतस्करीचा पर्दाफाश:पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई, ४ पिस्टलसह १०.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त

सोमाटणे फाट्यावर पिस्तूलतस्करीचा पर्दाफाश:पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई, ४ पिस्टलसह १०.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त

सोमाटणे (मावळ) : शहरातील अवैध शस्त्रसाठा आणि त्याच्या तस्करीविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सुरू केलेल्या धडक मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने सोमाटणे फाटा परिसरात चलाखीने सापळा रचत पिस्टल विक्रीसाठी आलेल्या तिघांच्या टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी चार देशी बनावटीची पिस्टल, सात जिवंत काडतुसे आणि एक आलिशान कार असा एकूण १० लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून शहरात मोठ्या गुन्ह्याची शक्यता रोखण्यात पोलिसांना यश आले आहे.

शहरात वाढत्या अवैध शस्त्रांच्या हालचालींवर लगाम घालण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष गस्त व गुप्त माहिती संकलन मोहीम सुरू होती. या दरम्यान पोलिसांना रेकॉर्डवरील गुन्हेगार सरदार सय्यद हा आपल्या साथीदारांसह तळेगाव दाभाडे परिसरातील सोमाटणे फाटा येथे पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

माहितीची खातरजमा करत पोलिसांनी १० मार्च २०२६ रोजी सोमाटणे फाटा परिसरातील एका निर्जन ठिकाणी सापळा रचला. काही वेळातच संशयास्पद हालचाली करत एक मारुती सुझुकी फ्रॉन्स कार तेथे दाखल झाली. पोलिसांनी क्षणार्धात कारला वेढा घालत तिघांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान आरोपींकडून सुरुवातीला तीन देशी बनावटीची पिस्टल आणि सहा जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली.

अधिक तपास आणि चौकशीत आरोपी प्रशांत सोनवणे याच्याकडून आणखी एक पिस्टल व एक जिवंत काडतूस मिळून आले. अशा प्रकारे पोलिसांनी एकूण चार पिस्टल आणि सात जिवंत काडतुसे जप्त केली. तसेच आरोपींच्या ताब्यातील आलिशान कारही जप्त करण्यात आली. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत १० लाख ९२ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सरदार अकबर सय्यद (वय २०, रा. तळेगाव दाभाडे), विशाल नाना कुडेकर (वय ३५, रा. खेड, पुणे) आणि प्रशांत बबुशा सोनवणे (वय २८, रा. चेंबूर, मुंबई) यांचा समावेश आहे. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत या शस्त्रतस्करीचे धागेदोरे थेट मध्यप्रदेशपर्यंत पोहोचत असल्याचे उघड झाले आहे. मुख्य आरोपी सरदार सय्यद याने ही शस्त्रे मध्यप्रदेशातील उमरटी येथील गुरुसिंग नावाच्या आरोपीकडून आणल्याची कबुली दिली आहे.

या प्रकरणातील गुरुसिंग हा सध्या फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक मध्यप्रदेशकडे रवाना होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अटकेत असलेला सरदार सय्यद हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात अपहरण, खंडणी तसेच ‘मोक्का’सारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त डॉ. शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ बालवडकर तसेच त्यांच्या पथकातील अंमलदारांनी अचूक माहिती, वेगवान हालचाल आणि धाडसी कारवाई करत संभाव्य गुन्हेगारी कट उधळून लावला.

या यशस्वी कारवाईमुळे शहरात अवैध शस्त्रसाठा रोखण्याच्या पोलिसांच्या मोहिमेला नवे बळ मिळाले असून गुन्हेगारीविरोधातील पोलिसांची सजगता पुन्हा अधोरेखित झाली आहे.

प्रतिनिधी:गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!