Homeमहत्त्वाचेस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातूनच लढल्या जातील आमदार सुनील शेळके

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातूनच लढल्या जातील आमदार सुनील शेळके

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातूनच लढल्या जातील आमदार सुनील शेळके

वडगाव मावळ, दि.२५ : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संघटनबांधणी व पक्षाच्या कामाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. मावळ तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सुरू असलेल्या विकासकामे आणि पक्षाचे ध्येय-धोरणे घराघरापर्यंत पोहोचवावीत, असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी केले.

वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात आयोजित मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

या मेळाव्यात तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, ज्येष्ठ नेते गणेशअप्पा ढोरे, विठ्ठलराव शिंदे, काळूराम मालपोटे, लक्ष्मणराव बालगुडे, भरत येवले, नारायण पाळेकर, दीपक हुलावळे, नारायण ठाकर, पंढरीनाथ ढोरे, शहराध्यक्ष सुरेश धोत्रे, प्रवीण झेंडे, रवी पोटफोडे, प्रवीण ढोरे, युवक तालुकाध्यक्ष किशोर सातकर, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सुवर्णा राऊत, कार्याध्यक्षा कल्याणी काजळे, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष वर्षा नवघणे, शहराध्यक्षा शैलजा काळोखे, पद्मावती ढोरे, युवती तालुकाध्यक्ष तेजस्विनी गरुड, सहकारसेल तालुकाध्यक्ष दिलीप ढोरे, अल्पसंख्यांक महिला सेल अध्यक्षा शबनम खान, विद्यार्थी सेल अध्यक्ष सुशांत बालगुडे आदींसह सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जबाबदारीने काम करण्याचे आवाहन

आमदार शेळके यांनी यावेळी पक्षाचे तालुका कार्यकारिणी तसेच सर्व सेल अध्यक्ष, शहराध्यक्ष व कार्याध्यक्ष यांच्याकडून पक्षाच्या कामाचा आढावा घेतला. “प्रत्येक पदाधिकाऱ्याने जबाबदारीने पक्षाचे काम केले पाहिजे. ज्यांना काम न करता पदे अडवून ठेवायची आहेत त्यांनी स्वतःहून बाजूला व्हावे. सहकार विभाग, शासकीय कमिटी आदी ठिकाणी जेव्हा संधी मिळाली ते कार्यकर्ते पक्षासाठी निष्ठेने काम करतील अशी अपेक्षा आहे. फक्त पदे मिळवून काम न करणे, हे चालणार नाही,” अशी स्पष्ट सूचना त्यांनी दिली.

विरोधकांवर निशाणा

यावेळी आमदार सुनील शेळके यांनी विरोधकांवर हल्लाबोल करताना म्हटले की, “मी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजप कार्यकर्त्याचे नाव घेतले, तर विरोधकांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारच नाही म्हणून माझ्यावर आरोप केले. जर त्यांना इतकाच आत्मविश्वास असेल तर त्यांनी स्वतःचा उमेदवार जाहीर करावा आणि पुन्हा एकदा आजमावून पाहावे,” असे थेट आव्हान त्यांनी विरोधकांना दिले.

एकहाती सत्ता मिळवण्याचा विश्वास

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातूनच लढल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीप्रमाणेच महायुती दृढ राहील.

“जर आपण अशा पद्धतीने एकत्र लढलो, तर जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोणावळा नगरपरिषद, तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि वडगाव नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस- महायुतीला एकहाती सत्ता येईल, असा मला पूर्ण विश्वास आहे,” असे आमदार शेळके यांनी ठामपणे सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट...

सह्याद्री नामा न्यूज | वडगाव मावळ | प्रतिनिधी मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट करण्यावर भर मावळ तालुक्यात...

केशवनगर येथील प्रभाग क्रमांक १ मधील विविध विकासकामांचा शुभारंभ आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला

वडगाव मावळ (ता. मावळ, जि. पुणे) | दि. २५ एप्रिल २०२६ केशवनगर येथील प्रभाग क्रमांक १ मधील विविध विकासकामांचा शुभारंभ आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला केशवनगर...

चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून; पती अटकेत, वडगाव मावळ हादरले

सह्याद्री नामा न्यूज | वडगाव मावळ | दि. २५ एप्रिल २०२६ चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून; पती अटकेत, वडगाव मावळ हादरले वडगाव मावळ परिसरात एका विवाहित महिलेच्या...

कामशेत येथे शेतकरी भवन उभारणीसाठी निधीची मागणी; मंत्री बाबासाहेब पाटील यांचे सकारात्मक आश्वासन

सह्याद्री नामा | वडगाव मावळ | दि. २३ कामशेत येथे शेतकरी भवन उभारणीसाठी निधीची मागणी; मंत्री बाबासाहेब पाटील यांचे सकारात्मक आश्वासन वडगाव मावळ : मावळ तालुका...

वडगाव मावळात शिक्षणासाठी पुढाकार – उपनगराध्यक्ष सुनिलभाऊ ढोरे यांची न्यू इंग्लिश स्कूलला मदतीचा हात

वडगाव मावळात शिक्षणासाठी पुढाकार – उपनगराध्यक्ष सुनिलभाऊ ढोरे यांची न्यू इंग्लिश स्कूलला मदतीचा हात वडगाव मावळ दिनांक : २१ एप्रिल २०२६ येथील न्यू इंग्लिश स्कूलला...

error: Content is protected !!