Homeसामाजिकजावेद हबीब या केस कर्तनालय क्षेत्रातील प्रसिद्ध व्यवसायाची सामाजिक बांधिलकी वृद्धाश्रमातील आजी-आजोबांच्या...

जावेद हबीब या केस कर्तनालय क्षेत्रातील प्रसिद्ध व्यवसायाची सामाजिक बांधिलकी वृद्धाश्रमातील आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद

जावेद हबीब या केस कर्तनालय क्षेत्रातील प्रसिद्ध व्यवसायाची सामाजिक बांधिलकी वृद्धाश्रमातील आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद

तळेगाव दाभाडे : माणसाचं वय कितीही वाढलं आणि तो वृद्ध झाला तरी मनापासून त्याला आपण तरुणच असावं असंच वाटत असतं त्यांची हीच भावना ओळखून जावेद हबीब या केस कर्तनालय क्षेत्रातील प्रसिद्ध व्यवसायाने तळेगाव स्टेशन येथील वानप्रस्थाश्रम या वृद्धाश्रमामधील आजी-आजोबांना चकाचक जवान करून टाकले जावेद हबीब ची मंडळी वानप्रस्थाश्रमात आली वानप्रस्थामाच्या अंगणात झाडाखाली खुर्च्या टाकल्या आजोबांना हळुवार त्यावर बसविले त्यांची गुळगुळीत दाढी केली

छान अशी कटिंग करून डोक्यावरचा केसाचा बोजा हलका केला तर काही आजोबांनी आग्रह केल्यावर त्यांचा तुळतुळीत गोटा देखील केला पायाची वाढलेली नखे कापून दिली विशेषतः पायाच्या अंगठ्याची नखे फारच जाड असल्याने कापता येत नाही ती नखे देखील कट करून दिली.

महिला कर्मचाऱ्यांनी आजीचे फेशियल करून दिले आयब्रोज काढले सुंदर अशा हेअर स्टाईल बनवून दिल्या हातात आरसा घेऊन प्रत्येक आजी-आजोबा आपला तजेलदार चेहरा बघून खुश होत होते.

या उपक्रमामुळे वानप्रस्थाश्रमातील एकूण माहोलच बदलून गेला होता जावेद हबीबच्या उज्वला मेश्राम यांना विचारले आपणास ही कल्पना कशी सुचली त्यावेळेस त्यांनी सांगितले की मी लहान असताना माझे आई-बाबा वारले मला त्यांचे चेहरेसुद्धा पाहायला मिळाले नाहीत. माझा सारा सांभाळ आजी-आजोबांनी केला.

त्यामुळे आजी आजोबांसाठी आयुष्यात काहीतरी करायचे मी ठरवलं. वृद्धपणी माणसे गलितगात्र झालेली असतात. समाज त्यांच्याकडे आदराने पाहत नाही. त्यांनाही वाटत असतं की आपण तरुणाप्रमाणे आनंदी जीवन जगावं हीच गरज ओळखून मी या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला व आज मी खूप आनंदी आहे.

यावेळी वानप्रस्थाश्रमाचे विश्वस्त सुरेश साखवळकर यांनी जावेद हबीबच्या उज्वला मेश्राम यांना शाल पांघरून व श्रीफळ देऊन त्यांच्या सत्कार केला विश्वस्त उर्मिला छाजेड यांनी जावेद हबीबने केलेले या विनामूल्य सेवेबद्दल त्यांचे आभार मानले या उपक्रमामुळे वृद्धाश्रमातील आजी आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद फुललेला पाहायला मिळाला.

प्रतिनिधी :गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!