Homeमहत्त्वाचेवडगाव नगरपंचायत प्रशासनाच्या गलथान कारभारा विरोधात ग्रामस्थांचं महादेव मंदिरात दुग्धाभिषेक आंदोलन

वडगाव नगरपंचायत प्रशासनाच्या गलथान कारभारा विरोधात ग्रामस्थांचं महादेव मंदिरात दुग्धाभिषेक आंदोलन

वडगाव नगरपंचायत प्रशासनाच्या गलथान कारभारा विरोधात ग्रामस्थांचं महादेव मंदिरात दुग्धाभिषेक आंदोलन

वडगाव मावळ दि-२१ सध्या राज्यामध्ये मान्सून पावसाचे जोरदार आगमन झाले असून पहिल्याच पावसात वडगाव नगरपंचायत कडून करण्यात येणाऱ्या नालेसफाई कामांची चांगलीच पोलखोल झाली मान्सून दाखल होण्यापूर्वी करण्यात येणारी नाले- ओढ्यांची सफाईची कामे ही वडगाव नगरपंचायत प्रशासनाने वेळेत पूर्ण न केल्यामुळे गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसाने वडगाव मुख्य बाजारपेठेत काहीशी पूर्जन्य परिस्थिती निर्माण झाली होती.

शहराच्या मधोमधुन वाहणाऱ्या देव ओढ्याला पावसाच्या पाण्याने अगदी नदीचे स्वरूप आल्याचे दृश्य तयार झाले होते ग्रामदैवत पोटोबा महाराज मंदिरा समोरून वाहणाऱ्या ओढ्याची नालेसफाई न झाल्याने पाण्याच्या मार्गामध्ये मोठा कचरा साठून दूषित पाणी व माती रस्त्यावरून ओसंडून वाहात बाजूला असणाऱ्या महादेव मंदिरात शिरल्याने मंदिर व पिंड पुर्णतः प्रदुषित व अपवित्र झाल्याने तसेच नगरपंचायत प्रशासनाने याची कोणतीही दखल गांभीर्याने न घेतल्याने.

मा.उपनगराध्यक्षा सायली रुपेश म्हाळसकर यांच्या नेतृत्वाखाली आज ग्रामस्थ व कार्यकर्त्यांच्या वतीने शंभू महादेव पिंडीला विधीवत दुग्धाभिषेक घालून पिंड व मंदिराचे शुद्धीकरण करण्यात आले व या घटनेला जबाबदार असणाऱ्या वडगाव नगरपंचायतच्या विरोधात ग्रामस्थांकडून निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी मनसे नेते रुपेश म्हाळसकर,पोटोबा देवस्थान विश्वस्त अनंता कुडे, श.प राष्ट्रवादी पक्ष तालुका अध्यक्ष विशाल वहिले, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अतुल राऊत, सुनील शिंदे, मनसे नेते तानाजी तोडकर, मनसे वडगाव शहराध्यक्ष मच्छिंद्र मोहिते, संतोष म्हाळसकर, शिवसेना नेते बाळासाहेब शिंदे, नितीन चव्हाण, आशिष म्हाळसकर,महेंद्र शिंदे, करण शिंदे, आदित्य म्हाळसकर प्रणव म्हाळसकर, विकास साबळे, आकाश वारिंगे, रोहित कोळी, विजय पाटील, अजिंक्य शिंदे, सुरेश धनवडे, रेणुका म्हाळसकर, अर्चना म्हाळसकर,मंदा म्हाळसकर,वंदना म्हाळसकर, अनुपमा शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!