Homeसामाजिकभारतीय जनता पार्टी वडगांव शहराने केले ३००० वारकरी बंधू भगिनींना ओ आर...

भारतीय जनता पार्टी वडगांव शहराने केले ३००० वारकरी बंधू भगिनींना ओ आर एस पॅकेट्स वाटप

भारतीय जनता पार्टी , वडगांव शहराच्या माध्यमातून श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी वारी करणाऱ्या वारकरी बंधू भगिनींना सुमारे ३००० ओ आर एस ( ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन ) पावडर च्या पॅकेट्स चे वाटप करण्यात आले.

इंदापूर येथे जाऊन तेथे मुक्कामी असलेल्या संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी समवेत असलेल्या , पायी चालणाऱ्या आणि विविध ठिकाणी राहुट्यांमध्ये जाऊन वारकरी बंधू भगिनींना या पॅकेट्स चे वाटप करण्यात आले.

इंदापुर येथेच मावळ तालुक्यातील श्री क्षेत्र घोरावडेश्वर दिंडी, वडगांव मावळ येथील तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज प्रासादिक दिंडी यांना देखील हे वाटप करण्यात आले.

मावळ तालुका पंचायत समितीचे मा.सभापती गुलाबराव म्हाळसकर , वडगांव शहर भारतीय जनता पार्टी चे अध्यक्ष संभाजीराव म्हाळसकर, तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थान चे विश्वस्त सचिव अनंता कुडे, विश्वस्त अरुण चव्हाण, वडगांव विविध कार्यकारी सोसायटी चे चेअरमन नारायणराव ढोरे, भाजपा ज्येष्ठ नेते पंढरीनाथ भिलारे , कायदेतज्ञ अजय शहा, मा.नगरसेवक किरण म्हाळसकर, भूषण मुथा, माथाडी नेते महेंद्र म्हाळसकर, अमोल धिडे, संभाजीराव येवले आदी याप्रसंगी उपस्थित होते.

या पावडरचा उपयोग शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यास (निर्जलीकरण) भरून काढण्यासाठी होतो. अतिसार, उलट्या किंवा जास्त घाम येणे यांसारख्या कारणांमुळे शरीरातील पाणी आणि क्षार कमी झाल्यास ही पावडर उपयुक्त ठरते तसेच शरीराला लवकर बरे होण्यास मदत करते.

या उपक्रमाबद्दल वारकरी बंधू भगिनींनी समाधान व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!