Homeमहत्त्वाचेमाझी वसुंधरा 6.0 अंतर्गत तळेगाव दाभाडे नगर परिषदेमार्फत शहरातील नागरिकांना शेवगा लागवडीसाठी...

माझी वसुंधरा 6.0 अंतर्गत तळेगाव दाभाडे नगर परिषदेमार्फत शहरातील नागरिकांना शेवगा लागवडीसाठी वृक्ष वाटप करण्यात आले

माझी वसुंधरा 6.0 अंतर्गत तळेगाव दाभाडे नगर परिषदेमार्फत शहरातील नागरिकांना शेवगा लागवडीसाठी वृक्ष वाटप करण्यात आले

तळेगाव दाभाडे : माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत पर्यावरण संवर्धन व हरित शहर निर्मितीसाठी तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून देशी प्रजातीच्या वृक्ष लागवडीच्या संकल्प करण्यात आला आहे. या अनुषंगाने बांबू, खस आणि शेवगा या उपयुक्त प्रजातीच्या लागवडीबाबत राज्य शासनामार्फत निर्देश दिले आहेत.

त्या अनुषंगाने तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून शेवगा प्रजातीची रोपे शहरातील नागरिक व परिसरातील विकासकांना मंगळवार दिनांक २जुलै २०२५ रोजी १०० वृक्ष वितरित करण्यात आले आहे.१०जुलै २०२५ पर्यंत १००० वृक्ष रोपे वाटप करण्याचा निर्धार तळेगाव दाभाडे नगर परिषदेने केला आहे. प्रत्येकाने आपल्या परिसरात सोसायटी,प्लाॅट, संस्था परिसरात ही रोपे लावून त्यांचे योग्य संगोपन करणे अपेक्षित आहे. शेवगा हा बहुपयोगी औषधी वनस्पती असून त्याची पाने,शेग, फुले आणि साल याचा विविध प्रकारे उपयोग होतो.

यामध्ये व्हिटामिन A, C कॅल्शियम, लोह आणि प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. तसेच शेवग्याच्या पानापासून तयार होणाऱ्या विविध उत्पादनांना देशी आणि परदेशी बाजारपेठेत मोठी मागणी आहे. वृक्ष वाटप कार्यक्रमाच्या वेळी बोलताना तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक म्हणाले की वृक्ष लागवड ही एक सामाजिक व नैतिक जबाबदारी असून पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येक नागरिकांचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे.

तळेगावातील शेतकरी. महिला बचत गट, गणेश मंडळे, सहकारी गृह रचना संस्था व सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून शेवग्याचे रोपण करून आरोग्यदायी व हरित पर्यावरणाच्या दिशेने पाऊल टाकावे आपण सर्वांनी एकत्र येऊन हरित तळेगाव घडवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी केले.

वृक्ष वाटप कार्यक्रम प्रसंगी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात, तळेगाव वाहतूक पोलीस उपनिरीक्षक गणेश लोंढे, पोलीस उपनिरीक्षक अहमद मुल्ला, तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या कर अधिकारी कल्याणी लांडे तसेच तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!