Homeताज्या बातम्यावडगांव नगरपंचायत प्रारूप विकास आराखडाच्या माध्यमातून ३० कोटी रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार मनसेचे...

वडगांव नगरपंचायत प्रारूप विकास आराखडाच्या माध्यमातून ३० कोटी रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळस्कर यांचा आरोप

वडगांव नगरपंचायत प्रारूप विकास आराखडाच्या माध्यमातून ३० कोटी रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळस्कर यांचा आरोप

वडगांव मावळ : विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मनसेचे माजी तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळस्कर यांनी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. वडगाव शहराचा पुढील वीस वर्षाचा नियोजित विकास साधण्यासाठी नुकताच प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला असून तो पूर्णतः मनमानी पद्धतीने व आर्थिक हित साधून बिल्डर धार्जिणा बनविण्यात आला आहे. यामध्ये स्थानिक अल्पभूधारक शेतकरी व वडगावातील नागरिकांवर मोठा अन्याय करण्यात आला आहे.

यावेळी नगररचना विभागाकडून वडगाव नगरपंचायतकडे हस्तांतरित करण्यात आलेला प्रारूप विकास आराखडा सर्व नगर सदस्यांच्या समोर खोलण्यात आला. मात्र तो विकास आराखडा प्रसिद्ध करण्यापूर्वी करण्यात आलेले ९९ बदल हे कोणत्याही सदस्याला विश्वासात न घेता व त्यांना न सांगता मा. नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांनी परस्पर आर्थिक हित साधून केले व ८ ऑगस्ट २०२३ रोजी नगरसेवकांची ५ वर्षीची मुदत संपल्यानंतर २६ फेब्रुवारी २०२४ रोजी सदर आराखडा प्रसिद्ध केला.

वडगाव नगरपंचायत स्थापनेच्या पहिल्याच पंचवार्षिक काळात विकास आराखडा तयार करण्याची गरज नक्की कोणाला भासली यातून कोणाचे आर्थिक हित साधले. निवडणुकीमध्ये खर्च करण्यात आलेला पैसा विकास आराखड्याच्या माध्यमातून धनिकांशी हात मिळवणी करून मोठ्या प्रमाणात वसूल करण्यात आला. यामध्ये साधारणतः ३० कोटी रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार करण्यात आला.

वडगाव नगरपंचायत स्थापने दरम्यानच्या महाराष्ट्रातील इतर कोणत्याही नगरपंचायतीचा विकास आराखडा हा तयार झालेला नाही मग वडगावचा विकास आराखडा घाई घाई का करण्यात आला व बॉडी बरखास्तीच्या काळातच प्रसिद्ध करण्यात आला.

मोनार्च एजन्सी यांनी अस्तित्वातील जमीन वापर नकाशा तयार केला असून सॅटेलाईट व प्रत्यक्ष स्थळ पाहणी सर्वे पूर्णतः चुकीचा केला आहे.

केतकर समिती पुढे एकूण ६५० हरकती व सूचना मांडण्यात आल्या. मात्र त्या हरकती औपचारिकता म्हणून ऐकून घेण्यात आला.

महागड्या गाड्यांमध्ये कोणकोण ये-जा करत होते, ज्या हॉटेल मध्ये मिटींग झाली त्याचे CCTV फुटेज, कॉल रेकॉर्ड तपासले पाहिजे. त्या दरम्यान अनेक मोठ्या बिल्डरांनी पैसे देऊन आरक्षण बदलून घेतले.

१६ जून २०२५ सुधारित प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला. एकूण हरकती पैकी फक्त ४३ आरक्षणात बदल करण्यात आले.

कोविड काळात ज्या महावीर भवनातून गोरगरिबांना वडगाव नगरपंचायतने दोन वेळ अन्न शिजवले व पुरवले त्याच पवित्र जैन स्थानकावरती काही लोकांनी आरक्षण टाकून त्यास अपवित्र करण्याचे काम केले.

सार्वजनिक शौचालय व इतर धार्मिकस्थळे विकास आराखड्यामध्ये पब्लिक, सेमी पब्लिक झोन मध्ये दर्शवण्यात आली मात्र महावीर भवन दाखवण्यात आले नाही. या उलट त्यावर आठवडा बाजाराचे आरक्षण टाकण्यात आले. यात काही लोकं मतांच राजकारण करण्यासाठी या सर्व गोष्टी करत आहे. एक बाजूला जैन धर्माची सहानुभूती मिळवण्यासाठी गोशाळा सुरू करायच्या आणि दुसरीकडे मात्र त्यांची आस्था असणाऱ्या पवित्र महावीर भावना वरती आमच्या लोकांनी ओळखल्या आहेत.. आरक्षण टाकायचे या गोष्टी आता जैन धर्मातील

संदीपजी बाफना यांच्या मालकीची गट नं-१९३ या जागेवर पार्किंग झोन आरक्षण टाकण्यात आले. पवित्र साधुसंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या याच जागेवर जैन भागवती दीक्षाचा कार्यक्रम हजारो लोकांच्या उपस्थितीत पार पडला त्याच पुण्यभूमी वरती राजकीय सूडबुद्धीने व आर्थिक फायद्यासाठी आरक्षण टाकण्यात आले.

गावठाण हद्दीतील उप रस्त्यांची रुंदी कमी करण्यात यावी. गणेश मंदिर ते शिवाजी चौक, रेल्वे हद्द ३० मीटर, दत्त मंदिर ते चिंचेचा गणपती वडगाव मुख्य रस्त्याची रुंदी कमी करणे वडगाव नगरपंचायत ते पंचायत समिती चौक १२ मीटर करण्यात यावा.

मतांच्या राजकारणासाठी जाणून बुजून काही ठिकाणी आरक्षण टाकून त्या ठिकाणचे आरक्षण काढून श्रेय लाटण्याचं काम काहीजण करत आहेत.

विकास आराखड्‌याच्या मनमानी कारभाराविरुद्ध जन आंदोलन उभे करून कायदेशीर लढा दिला जाईल.

शहराचा विकास आराखडा तयार करत असताना कोणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे होती. या प्रारुप विकास आराखड्‌यावर अनेक हरकती असल्यामुळे हा प्रारुप विकास आराखडा रद्द करून नव्याने पाहणी व सर्वेक्षण करून नवीन शहर प्रारुप विकास आराखडा तयार करण्यात यावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!