पोस्टाच्या आयटी २.० सेवेचा लाभ घ्या
तळेगाव दाभाडे : ग्राहकांसाठी जलद व कार्यक्षम सेवा. सुलभ वापर व अचूक आणि पारदर्शक व्यवहार यासाठी आयटी २.० ही प्रणाली २२जुलै पासून सुरू करण्यात आली असून त्याचे उद्घाटन डाक संचालक अभिजीत बनसोडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी रेल डाक सेवा अधीक्षक बी. पी. एरंडे, वाय.आर. वाळुंजकर, पी.ई. भोसले.जी.एच.वडुरकर. केतन क्षिंत्रे. ए. व्हि. केंद्रे, नागेश डुकरे, अर्चना कुमारी, व्हि.एस. कुलकर्णी व अन्य मान्यवर उपस्थित होते. डिजिटल भारताच्या दिशेने टाकलेले हे पाऊल असल्याचे बी.पी. एरंडे यांनी सांगितले.
कामात व्यस्त असल्याने जे नागरिक कार्यालयीन वेळेत पार्सल किंवा स्पीड पोस्ट करू शकत नाही. त्यांना आता रात्री अगर दिवसाच्या कोणत्याही वेळी या सेवेचा लाभ घेता येईल असे बी.पी एरंडे यांनी सांगितले.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११






















