भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, श्री रमेश कुमार सहानी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सैनिकांना बांधली राखी
वडगांव मावळ : भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, श्री रमेश कुमार सहानी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वडगाव, शाळेतर्फे डीओडी डेपो तळेगाव या ठिकाणी सैनिकांसोबत रक्षाबंधनाचा अतिशय सुंदर कार्यक्रम साजरा करण्यात आला शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते नृत्य जवानांसमोर सादर केली त्यानंतर सर्व जवानांना सर्व विद्यार्थिनींनी औक्षण करून राखी बांधली
त्यावेळी डीओडी चीफ कमांडर शशांक सिंग सर, मेजर शरीफ अश्रफ सर तसेच अनेक सैनिक उपस्थित होते कार्यक्रम पाहून सर्वजण देखील भारावून गेले होते
या प्रसंगी शाळेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बाळासाहेब म्हाळसकर, उपाध्यक्ष सचिन नारायण ढोर, सचिव राजेंद्र पांडुरंग वहिले, शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर मॅडम, व्यवस्थापक आदिनाथ आगळमे , शिक्षिका सुवर्णा शिंदे, सुषमा चौगुले, कु.रसिका म्हाळसकर , श्रद्धा खोमणे, धनश्री वैद्, स्मिता कांबळे, तोहीदा खान, कु. अक्षया गरुड, व गणेश बिसोकर्मा सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते




















