अटल आरोग्य अभियानांतर्गत मावळ विचार मंच यांच्या माध्यमातून आर के लुंकड डायलिसिस सेंटर चा उद्घाटन समारंभ संपन्न
वडगाव मावळ – रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त अटल आरोग्य अभियानांतर्गत, मावळ विचार मंच यांच्या माध्यमातून, आर के लुंकड यांच्या सहयोगातून आर के लुंकड डायलिसिस सेंटरचे आर के लुंकड उद्योगसमूहाचे अध्यक्ष रमणलाल लुंकड यांच्या हस्ते आणि मावळ विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मावळ विचार मंचाचे अध्यक्ष गुलाबराव म्हाळसकर, याप्रसंगी उद्योजक रविंद्र लुंकड ,
बोरा क्लासेस चे संचालक प्रा.किरण बोरा, सामाजिक कार्यकर्ते सुनिल देसरडा, जय आनंद ग्रुप चे विजय मरलेचा, वडगांव जैन स्थानकवासी श्रावक संघाचे अध्यक्ष सुभाषचंद्र मुथा, शिवाजीराव पालवे, पद्मराज जाधवर, निलेश जाधवर, मोतीराम जाधवर, ज्ञानदेव पाटील,दिलीप उकिरडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत
करण्यात आले.
आर के लुंकड उद्योगसमूहाचे चेअरमन आणि उद्घाटक रमणलाल लुंकड यांनी आपल्या मनोगतात त्यांच्या सामाजिक कार्याचा जीवनपट उलगडताना कमावलेल्या धनाचा सदुपयोग समाजातील विविध क्षेत्रातील गरजूंना व्हावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले , लवकरच आणखी १. डायलिसिस मशीन भेट देऊन गरजु रुग्णांची सुविधा होणार असल्याचे मी व्यक्त केले.
वडगाव शहरातील डायलिसिस उपचार घेणाऱ्या रुग्णांना शहरापासून दूर जावे लागते,अधिक पैसे खर्च होतात. रुग्णासह सोबत असलेल्या नातेवाईकांच्या वेळेचा अपव्यय होतो. या सर्व गैरसोयी लक्षात घेऊन मावळ विचार मंच संस्थेच्या वतीने रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आर के लुंकड उद्योगसमूहाच्या सहयोगातून हा प्रकल्प सुरू करण्यात आल्याची माहिती भास्करराव म्हाळसकर यांनी दिली.
कार्याध्यक्ष डॉ. रविंद्र आचार्य यांनी मावळ विचार मंच संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असल्याचे सांगत या डायलिसिस प्रकल्पाचे महत्त्व विषद केले.
प्रा.किरण बोरा यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत गरजू रुग्णांची सोय या माध्यमातून होणार असल्याचे मत व्यक्त केले. यापुढे देखील अशी सेवाकार्य करावीत त्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
उद्योजक विजय मरलेचा यांनी मावळ विचार मंच करत असलेल्या अनेक सामाजिक उपक्रमांबद्दल आपले मत व्यक्त करतांना संस्था समाजातील गरजू नागरिकांपर्यंत पोहोचून अत्यंत आत्मियतेने सेवाकार्य करत असल्याचे सांगितले.
ज्येष्ठ मार्गदर्शक अशोकलाल गुजराणी, सोमनाथ काळे , वसंतराव भिलारे, झुंबरलाल कर्नावट , वडगांव विविध कार्यकारी सोसायटी चे चेअरमन नारायणराव ढोरे, तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थान चे अध्यक्ष किरण भिलारे , विश्वस्त सचिव अनंता कुडे, वडगांव शहर भाजपा अध्यक्ष संभाजीराव म्हाळसकर, मा.उपसरपंच सुधाकरराव ढोरे, मा.नगरसेवक प्रसाद पिंगळे, मा.नगरसेवक रविंद्र म्हाळसकर, विठ्ठलराव घारे , ॲड.निवृत्ती फलके, उपाध्यक्ष अशोक चव्हाण , बाळासाहेब बोरावके , जयवंत दुगम ,
नगरसेविका सुनीताताई भिलारे, युवा मोर्चा अध्यक्ष आतिश ढोरे, पत्रकार सुदेश गिरमे, उद्योजक राजेश बाफना , नंदकिशोर गाडे, कैलास सोळंकी , डॉ.पार्थ शिंदे,
मावळ विचार मंचाचे कार्याध्यक्ष पूजाताई पिंगळे , वैशालीताई ढोरे , हर्षदाताई दुबे, धनश्रीताई भोंडवे , अनिताताई म्हाळसकर, सपनाताई म्हाळसकर, श्रेयाताई भंडारी , अश्विनीताई बवरे, सुवर्णाताई गाडे, अतुल म्हाळसकर, सुयश म्हाळसकर , डॉ. स्मिता जाधवर तसेच उपाध्यक्ष संतोष भालेराव , सचिव अमोल ठोंबरे , आदी उपस्थित होते.
या प्रकल्पाचे समन्वयक म्हणून कार्याध्यक्ष डॉ.रविंद्र आचार्य , सचिव डॉ.सुनील बाफना , ॲड. विजयराव जाधव , मा.नगरसेवक किरण म्हाळसकर , मा.नगरसेवक शंकर भोंडवे , सुरेंद्र एस. बाफना , कल्पेश भोंडवे , अतुल राऊत , गिरीश गुजराणी हे काम पाहणार आहेत.
स्वागत डॉ.विकास जाधवर यांनी केले ज्यात त्यांनी MJPJAY आणि PMJAY अंतर्गत मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध असल्याची माहिती दिली.
प्रास्ताविक मावळ विचार मंचाचे अध्यक्ष गुलाबराव म्हाळसकर यांनी केले ज्यात त्यांनी संस्थेच्या विविध कार्याची माहिती दिली.
सूत्रसंचालन मा. नगरसेवक भूषण मुथा यांनी केले. आभार प्रदर्शन मा.नगरसेवक ॲड. विजयराव जाधव यांनी केले.




















