Homeआरोग्यकामशेतमध्ये ‘क्रिस्टल क्लिनिक’तर्फे लहान मुलांसाठी मोफत दंततपासणी शिबिर

कामशेतमध्ये ‘क्रिस्टल क्लिनिक’तर्फे लहान मुलांसाठी मोफत दंततपासणी शिबिर

कामशेत (मावळ) : लहान वयातच दातांची योग्य काळजी घेतली गेली तर भविष्यातील अनेक दंतविकार टाळता येऊ शकतात, या उद्देशाने क्रिस्टल क्लिनिक – लहान मुलांचा दवाखाना यांच्या वतीने मुलांसाठी मोफत दंततपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दि. ०६ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असून, पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या शिबिरात प्रसिद्ध बालदंततज्ज्ञ डॉ. शिखा सिन्हा (बी.डी.एस. ऑनर्स, पीजीडीएचएचएम, अॅडव्हान्स पेडियाट्रिक डेंटिस्ट्री प्रमाणित) या मुलांच्या दातांची सखोल तपासणी करणार आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे व चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे लहान मुलांमध्ये दात किडणे, दात दुखणे, वाकडे-तिरके दात, तोंडाने श्वास घेण्याची सवय, बोट चोखणे अशा समस्या वाढताना दिसत आहेत. या सर्व समस्यांवर या शिबिरात योग्य मार्गदर्शन व उपचार दिले जाणार आहेत.

शिबिरात गरजेनुसार दात काढणे, किडलेल्या दातांवर पल्पेक्टॉमी व पल्पोटोमी उपचार, मेटल क्राउन बसवणे, दात भरणे, स्केलिंग व पॉलिशिंग, तसेच दात किडू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपचार व फ्लोराईड लावणे यासारख्या सेवा उपलब्ध असतील. याशिवाय जीभ बांधलेली असल्यास टंग-टाय रिलीज, फ्रेनेक्टॉमी, तसेच वाकडे दात सरळ करण्याचे उपचार व चुकीच्या सवयी सोडवण्यासाठी विशेष उपकरणे याबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.

हे शिबिर फुगे कॉम्प्लेक्स, साईबाबा चौक, बाजार, कामशेत, मावळ येथे आयोजित करण्यात आले असून अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक : ९०८२३ ८३३२८ वर संपर्क साधावा, असे आवाहन क्लिनिकच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!