Homeआरोग्यकान्हे फाटा येथील सरकारी रुग्णालयात सुविधांचा अभाव वंचित बहुजन युवा आघाडी मावळच्या...

कान्हे फाटा येथील सरकारी रुग्णालयात सुविधांचा अभाव वंचित बहुजन युवा आघाडी मावळच्या पुढाकारानंतर तातडीने दखल घेत रुग्णालयातील त्रुटी दूर करण्यास सुरुवात केली

कान्हे फाटा येथील सरकारी रुग्णालयात सुविधांचा अभाव वंचित बहुजन युवा आघाडी मावळच्या पुढाकारानंतर तातडीने दखल घेत रुग्णालयातील त्रुटी दूर करण्यास सुरुवात केली.

कामशेत : मावळ तालुक्यातील कान्हे फाटा येथील सरकारी उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक सुविधा जसे की डॉक्टर. कर्मचारी व यंत्रसामुग्रीचा अभाव असल्याचे वास्तव वंचित बहुजन युवा आघाडी मावळचे युवा अध्यक्ष संदीप कदम यांनी उघड केले आहे.

त्यांच्या पुढाकारानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत रुग्णालयातील त्रुटी दूर करण्यास सुरुवात केली आहे. वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष संदीप कदम हे सोमवार दिनांक २३ जून २०२५ रोजी आपल्या मुलीच्या उपचारासाठी कान्हे फाटा येथील सरकारी उपजिल्हा रुग्णालयात गेले असता. तेथे इंजेक्शन उपलब्ध नसल्याने ते बाहेरून आणावे लागले तसेच इतर अनेक असुविधाही त्यांच्या लक्षात आल्या त्याबाबत त्यांनी त्वरित रुग्णालय प्रशासनाशी या विषयावर चर्चा केली व माध्यमातून माहिती दिली.

या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन दुसऱ्याच दिवशी पुणे जिल्हा रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ वंदना जोशी, वडगाव मावळ उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ बी. आर. पाटील, बालरोगतज्ञ डॉ भूषण बेडेकर आणि वैद्यकीय अधिकारी संकेत मळेकर यांनी कान्हे फाटा येथील सरकारी उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली.

यावेळी वंचित बहुजन आघाडी मावळ तालुका अध्यक्ष नितीन ओव्हाळ, युवा आघाडी अध्यक्ष संदीप कदम, महिला आघाडी अध्यक्षा मनीषा ओव्हाळ, माजी अध्यक्ष बाळकृष्ण टपाले, ज्येष्ठ नेते शंकर कदम,  उपाध्यक्ष निलेश टपाले, सचिव लहू लोखंडे, महासचिव अक्षय साळवे, वडगाव शहर उपाध्यक्ष पवन उदागे, युवा नेते सुमित साळवे, युवा सचिव प्रवीण गायकवाड हे उपस्थित होते.

शासकीय अधिकाऱ्यांनी रुग्णालयातील असणाऱ्या त्रुटी दूर करण्याचे आश्वासन यावेळी वंचित बहुजन आघाडी मावळ तालुक्याच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या असून. रुग्णालयातील सर्व सेवा सुरळीत करण्यात आल्या आहेत. कोणालाही रुग्णालयाविषयी अडचण आल्यास वंचित बहुजन युवा आघाडीशी संपर्क साधण्याचे आवाहन युवा आघाडीचे अध्यक्ष संदीप कदम यांनी केले आहे.

प्रतिनिधी = गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!