जिल्हा परिषद शाळेची माजी विद्यार्थिनी अनुक्षा डोंबे बनली शास्त्रज्ञ
तळेगाव दाभाडे : येथील अनुक्षा डोंबे हि युवती शास्त्रज्ञ झाली आहे. तिचे प्राथमिक शिक्षण माळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले आहे तर तळेगाव येथील रामभाऊ परुळेकर या शाळेत माध्यमिक शिक्षण झाले असून महाविद्यालयीन शिक्षण इंद्रायणी महाविद्यालयात झाले.
दिल्ली येथे अनुक्षा हिने एम टेक केले त्यानंतर इंटरन शनल कॉन्फरन्स मध्ये आपला संशोधनाचा आकृतीबंध सादर केला. सध्या अनुक्षा हि अमोघ केमिकल कंपनीमध्ये ज्युनियर शास्त्रज्ञ या पदावर कार्यरत आहे. तिच्या या यशाचे मावळ मधून सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
तळेगावकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेऊन उज्वल यश संपादन करता येते याचे उत्तम उदाहरण अनुक्षा हिने दाखवून दिले आहे.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११























