Homeसामाजिकमावळ तालुक्यात सर्रासपणे अमली पदार्थ विक्री विरोधात कामशेत येथे १५ ऑगस्ट रोजी...

मावळ तालुक्यात सर्रासपणे अमली पदार्थ विक्री विरोधात कामशेत येथे १५ ऑगस्ट रोजी लक्षणिक उपोषण करणार माजी सरपंच अभिमन्यू शिंदे

कामशेत : मावळ तालुक्याला ऐतिहासिक महत्व आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा सहवास या मावळ भूमीला लाभला आहे. तसेच संत तुकाराम महाराज, संत जगनाडे महाराज या संत परंपरेचा तालुक्यात वारसा जपणारे वारकरी आहेत; परंतु अशा माझ्या मावळ भूमीत सध्या अमली पदार्थ सर्रासपणे विक्री होत असल्याने तरुण पिढी व शालेय विद्यार्थी व्यसनाच्या आहारी जात आहे. मावळ तालुक्यात लोणावळा, तळेगाव दाभाडे, वडगाव, देहू, देहूरोड, कामशेत अशा मोठ्या शहरात व ग्रामीण भागात सर्रासपणे गांजा, एमडी पावडर, ड्रग्ज अशा अमली पदार्थाची विक्री होत आहे.

यामुळे काही शालेय विद्यार्थी व्यसनाच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे त्यांचे आयुष्य धोक्यात आले आहे. तसेच त्यांच्या कुटुंबाची मोठी हानी होत असल्याची माहिती कामशेत चे माजी सरपंच अभिमन्यू प्रकाश शिंदे यांनी एका प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली आहे‌.

मावळ तालुक्यात विविध नामाकिंत वि‌द्यापीठ, कॉलेज स्थापन झालेले आहेत. काही समाज विद्रूप करणारी टोळी वि‌द्यार्थ्यांना नशेच्या आहारी लावत आहे. तालुक्यात शालेय आवारात काही ठिकाणी सर्रासपणे गुटखा, तंबाखू, मावा विक्री केली जात आहे; ह्या अशा गोष्टीना आळा घालून माझ्या तरुण बांधवाना नशेच्या आहारी जाण्यापासून वाचवले पाहिजे, प्रशासनाने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी माजी सरपंच अभिमन्यू शिंदे यांनी केली आहे.

तालुक्यात अमली पदार्थाची सर्रासपणे विक्री होत असल्याच्या विरोधात शुक्रवार दिनांक १५ऑगस्ट २०२५रोजी, सकाळी १०:३०वा. महादेव मंदीर, बाजारपेठ, रेल्वे स्टेशन जवळ, कामशेत येथे लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!