वडगांव शहर भारतीय जनता पक्षाचे वतीने विविध मागण्यांचे निवेदन वडगाव नगरपंचायतला देण्यात आले.
वडगांव मावळ : वडगांव शहर भारतीय जनता पक्षाचे वतीने विविध मागण्यांचे निवेदन वडगाव नगरपंचायतला देण्यात आले यावेळी निवेदनात असे म्हटले आहे की वडगांव नगरपंचायतीच्या वतीने सन २०२५-२६ या मिळकत कर देयकामध्ये मिळकतदारांकडून शिक्षण कर अनावश्यक वसूल केला जात आहे. कारण वडगांव नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये असणाऱ्या प्राथमिक शाळांचे व्यवस्थापन जिल्हा परिषद चे माध्यमातून केले जात असताना त्याचा आर्थिक भार मिळकतदारांना पडत आहे. तरी सदर शिक्षण करामध्ये मिळकतदारांना सवलत मिळावी.
वडगांव स्मशानभूमी मध्ये अंत्यसंस्कार होत असताना त्याठिकाणी स्मशान पास व्यवस्था करणेत यावी त्याचा उपयोग संबंधितांना मृत्यू दाखला मिळविणे कामी सोइचे होईन. चुकून कोणाची मृत्यू नोंद राहून गेली तर चुकून कोर्टाची पायरी चढावी लागते व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तसे त्याच्या पैशाची देखील नासाडी होते.
नगरपंचायतीमार्फत अपंग कल्याण निधी बजेटच्या ५ टक्के निधी त्वरीत वाटप करा
स्मशानभूमी मधील नवीन शेड मध्ये लाईट व्यवस्था करणेत आलेली आहे परंतु त्याठिकाणी असणाऱ्या वायर हया मोकळया आहेत. त्यामुळे त्यांचा करंट लोखंडामध्ये येवून अपघात होण्याची शक्यता आहे.
सध्या वडगांव नगरपंचायतीकडून सन २०२५-२६ चे कर मागणी पत्रके वितरीत करण्यात येत आहे. सदरची कर देयकांबाबत जर मिळकतदारांनी वेळेवर भरणेकामी नगरपंचायतीच्या वतीने त्याबाबत असणाऱ्या सवलतीची माहिती ही कर मागणी देयकावर छापली नसल्याने त्याभाबत मिळकतदार अनभिज्ञ आहे.
तरी याबाबत सवलतीच्या माहितीसह देयके वितरीत करणेत यावीत अथवा सवलतीची माहिती फलक शहराच्या सर्व प्रभागामध्ये लावण्यात यावेत. जेणेकरून मिळकतदार वेळेवर भरणा करतील व नगरपंचायतीस वेळेवर मोठ्या प्रमाणात कर भरणा प्राप्त होवून त्याचा उपयोग शहरातील नागरिकांच्या जनसुविधा उपलब्ध करून देणेकामी होईल.
तरी वरील सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी असे वडगाव शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष संभाजी म्हाळसकर यांनी केले आहे.




















