Homeमहत्त्वाचे २७ वर्षात किवळे स्मशानभूमी चा विकासच झाला नसल्याने ग्रामस्थ आक्रमक. पिंपरी चिंचवड...

 २७ वर्षात किवळे स्मशानभूमी चा विकासच झाला नसल्याने ग्रामस्थ आक्रमक. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नावाने घातले श्राद्ध

 २७ वर्षात किवळे स्मशानभूमी चा विकासच झाला नसल्याने ग्रामस्थ आक्रमक. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नावाने घातले श्राद्ध

देहुरोड : किवळे येथे असणाऱ्या स्मशानभूमीच्या विकासाकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून २७ वर्ष झाले दुर्लक्ष असल्यामुळे किवळे ग्रामस्थ संतप्त झाले ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला आहे. ग्रामस्थांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नावाने श्राद्ध घालून उपरोधिक आंदोलन केले

या आंदोलनात माजी नगरसेवक बाळासाहेब तरस, सामाजिक कार्यकर्ते धम्मपाल तंतरपाळे, युवा सेना मावळ अध्यक्ष राजेंद्र तरस, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बापूसाहेब कातळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नानासाहेब डोईफोडे, शिवसेना उप शहर प्रमुख नवनाथ तरस, रविद्र कदम, पंढरीनाथ सानप, राजू महाले, विश्वास आंबेकर, सुधिर तरस, रघु गव्हाळे, गणेश हिंगे, मेघराज तंतरपाळे, अजय बाखरिया, सुनील ननावरे, राजू पवार, पंकज तंतरपाळे, नारायण खंडागळे, आदी उपस्थित होते.

सामाजिक कार्यकर्ते धम्मपाल तंतरपाळे यांच्या नेतृत्वाखाली हे अनोखे आंदोलन पार पडले. या संदर्भात बोलताना धम्मपाल तंतरपाळे म्हणाले की किवळे गावचा महापालिकेत समावेश होऊन बराच काळ लोटला असला तरी येथील स्मशानभूमीचा विकास अद्याप झालेलाच नाही. शेजारील नदीपात्रातील वाढते पाणी. चिखलमय जागा. जलपर्णीच्या विळखा. महिलांसाठी शौचालयाचा अभाव.तुडलेले नळ खचलेले रस्ते. अपुरा प्रवचन मंडप. आदी समस्यांनी किवळे स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.

शिवाय स्मशानभूमी ज्या जागेवर आहे त्या जागेचे आरक्षण जुने असून संबंधित मालकाला अद्यापही मोबदला मिळालेला नाही.मृत व्यक्तीला दहण करण्यासाठी केवळ दोनच जाळ्या असल्याने ग्रामस्थांना देहूरोड कँटोन्मेंट बोर्डावर अवलंबून राहावे लागत आहे या सर्व परिस्थितीचा निषेध नोंदवण्यासाठी किवळे ग्रामस्थांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे श्राद्ध घालून अनोखे आंदोलन केले.

या आंदोलनाच्या वेळी महापालिका ब प्रभाग स्थापत्य विभागाचे कनिष्ठ अभियंता संदीप खोत व अमोल पवार यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन स्मशानभूमी संबंधित सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण केली जातील असे लेखी आश्वासन आंदोलन कर्त्यांना दिले आहे या लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी तात्पुरते आंदोलन स्थगित केले आहे. या आंदोलनादरम्यान रावेत पोलिसांनी योग्य तो पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता.किवळे ग्रामस्थांच्या या अनोख्या आंदोलनाची चर्चा सर्वत्र होत आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!