Homeशिक्षण-प्रशिक्षणकासारसाई शाळेतील नीरज कुंभार याची मुळशी तालुक्यातून नवोदय विद्यालयासाठी निवड स्वातंत्र्यदिनी ग्रामस्थांकडून...

कासारसाई शाळेतील नीरज कुंभार याची मुळशी तालुक्यातून नवोदय विद्यालयासाठी निवड स्वातंत्र्यदिनी ग्रामस्थांकडून विशेष सत्कार

कासारसाई : नवोदय विद्यालय निवडीसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत मुळशी तालुक्यातील कासारसाई शाळेतील विद्यार्थी नीरज कुंभार याची निवड झाली आहे. संपूर्ण मुळशी तालुक्यातून नवोदय करिता निवडण्यात आलेला नीरज हा एकमेव विद्यार्थी असल्याचे त्याच्या पालकांनी सांगितले. तसेच नीरजच्या या उज्वल यशाबद्दल संपूर्ण शाळा प्रशासन आणि ग्रामस्थांकडून स्वातंत्र्यदिनी त्याचा विशेष सत्कार करण्यात आला आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारसाई ( ता. मुळशी ) येथील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी नीरज तुषार कुंभार याची नवोदय विद्यालय, पिंपळे जगताप, पुणे येथे 92.50 टक्के गुण मिळवून निवड झाली आहे. ही निवड झालेली नीरज हा मुळशी तालुक्यातील एकमेव विद्यार्थी आहे. ही शिष्यवृत्ती परीक्षा 2025 फेब्रुवारी महिन्यात पार पडली होती. इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पुणे जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये त्याने 300 पैकी 272 मार्क मिळवून उज्वल यश संपादन केले आहे.

स्वातंत्र्यदिनी विशेष सत्कार

शुक्रवारी (दि. १५ ऑगस्ट ) रोजी भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात कासारसाई शाळेत शाळा प्रशासन आणि ग्रामस्थांकडून नवोदय परीक्षेत यश मिळविल्याबद्दल नीरज कुंभार याचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवल्याबद्दल व नवोदय विद्यालयासाठी निवड झाल्याबद्दल नीरज याला वर्गशिक्षिका काचळे मॅडम यांनी सायकल भेट म्हणून दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!