Homeमहत्त्वाचेकिल्ले लोहगड व विसापूर वरील शिवमंदिरात श्रावणी सोमवारच्या अभिषेकाची अखंडित परंपरा

किल्ले लोहगड व विसापूर वरील शिवमंदिरात श्रावणी सोमवारच्या अभिषेकाची अखंडित परंपरा

किल्ले लोहगड व विसापूर वरील शिवमंदिरात श्रावणी सोमवारच्या अभिषेकाची अखंडित परंपरा

भाजे : श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंचाच्या वतीने गेली २५ वर्षे लोहगड वरील शिवमंदिरात तसेच, गेली १० वर्षे विसापूर वरील शिवमंदिरात श्रावणी सोमवार निमित्त अभिषेक करण्यात येतो. ही परंपरा या वर्षी देखील अखंडित राहिली. यामध्ये प्रामुख्याने स्थानिक ग्रामस्थ, मंचाचे कार्यकर्ते व पंचक्रोशील शिवप्रेमी यांचा सहभाग होता.

विसापूर किल्ल्यावरील अभिषेकाचे नियोजन अध्यक्ष विश्वास दौंडकर, कार्याध्यक्ष सागर कुंभार, अनिकेत आंबेकर, अजय मयेकर, सागर दळवी, अनिकेत घरदाळे, बाळकृष्ण कोंडभर, मुकुंद तिकोने, चेतन जोशी यांनी केले. तसेच लोहगड वरील अभिषेकाचे नियोजन संस्थापक सचिन टेकवडे, मार्गदर्शक संदीप गाडे, कैलास वाघमारे, मंगेश रवणे, सचिन निंबाळकर, गणेश उंडे, बसप्पा भंडारी, अमोल गोरे, ओंकार मेढी, सिद्धू जाधव यांनी केले. दोन्ही किल्ल्यावरील शिवमंदिर हे जागृत स्थान असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी गडावर येत असतात.

छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतः शिवभक्त होते. त्यामुळे त्यांनी गडकिल्ल्यांवरती शिवमंदिरे बांधून घेतलेली आपल्याला आढळतात. परंतु, लोहगड वरील शिवमंदिराच्या भोवती असलेल्या दगडी तटबंदी आता नामशेष झाल्या आहेत. तसेच, विसापूर किल्ल्यावरील शिवमंदिराच्या छपरावर असणारे पत्रे हे कधीही कोसळतील अशा अवस्थेत आहेत.

कारण त्या पत्राच्या आत मध्ये असलेले लाकूड हे पूर्णपणे कुजले आहेत. याकडे पुरातत्व विभागाने ताबडतोब लक्ष द्यावे. दोन्ही किल्ल्यावरील शिवमंदिरे पुन्हा आपले गतवैभव प्राप्त करतील अशा प्रकारचे जीर्णोद्धाराचे काम भारतीय पुरातत्व विभागाने करावे असे आवाहन या अभिषेकाच्या निमित्त संस्थापक सचिन टेकवडे यांनी केले.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!