Homeसामाजिक“मनोरंजन संध्या २०२५” ची धमाकेदार सुरुवातगोळेवाडी, वारिंगेवाडीत महिलांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद

“मनोरंजन संध्या २०२५” ची धमाकेदार सुरुवातगोळेवाडी, वारिंगेवाडीत महिलांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद

मावळ –गावागावांत सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांद्वारे जनतेच्या मनात वेगळे स्थान निर्माण करणारे श्री. प्रशांतदादा भागवत यांच्या प्रेरणेतून प्रशांतदादा भागवत युवा मंच तर्फे महिलांसाठी खास “मनोरंजन संध्या २०२५” या उपक्रमाची गोळेवाडीत धमाकेदार सुरुवात झाली. हास्य, खेळ, गाणी, मैफली अशा विविध कार्यक्रमांनी सजलेल्या या संध्याकाळी महिलांनी प्रचंड उत्साहाने सहभाग नोंदवला.

भर पावसातही महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभल्याने परिसरात उत्सवाचे स्वरूप निर्माण झाले होते. या सोहळ्याला आंबी ग्रुप ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच माधुरीताई जाधव, माजी सरपंच अलकाताई जाधव, सुमनताई मापारी, रोहिदासजी जगदाळे, पोलीस पाटील भानुदाजी दरेकर, विष्णू गोळे, दत्ता लोंढे, सुरेश घोजगे यांच्यासह ग्रामस्थ, युवा कार्यकर्ते नामदेवभाऊ गराडे, भानुदास दरेकर आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

तसेच वारिंगेवाडीत झालेल्या कार्यक्रमास अहिल्याताई मांडेकर, अध्यक्षा दिपालीताई तोडकर, सचिव ज्योतीताई शिंदे, कार्याध्यक्ष मोहिनीताई मांडेकर, सचिव मंदाताई वारिंगे, उपाध्यक्ष अनिता करके, सचिव सुप्रिया कलवडे, सरपंच सरीखाताई धुमाळ, अनिताताई सावले – बीजेपी महिला आघाडीच्या अध्यक्षा याही प्रमुख उपस्थित होत्या.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रशांतदादा भागवत म्हणाले, “मनोरंजन संध्या २०२५ हा केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नाही, तर महिलांच्या सहभागातून गावागावात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा उपक्रम आहे. समाज घडविण्यात महिलांची भूमिका महत्त्वाची असून त्यांच्या कलागुणांना व उत्साहाला योग्य व्यासपीठ मिळाले पाहिजे. या उपक्रमातून एकोपा, आत्मविश्वास आणि आनंदाची नवी प्रेरणा गावागावांत पोहोचेल, हीच खरी ताकद आहे. यापुढेही अशा संध्यांचे आयोजन करून महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने काम करत राहणार आहे.”

या उपक्रमामुळे महिलांच्या कलागुणांना आणि सामाजिक सहभागाला नवे व्यासपीठ मिळाले असून, मावळात सांस्कृतिक चळवळीला नवसंजीवनी मिळाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!