Homeसामाजिकश्री क्षेत्र घोरावडेश्वर येथे मोठी दुर्घटना — दगड कोसळून एक जखमी, मंदिर...

श्री क्षेत्र घोरावडेश्वर येथे मोठी दुर्घटना — दगड कोसळून एक जखमी, मंदिर परिसरातील वीजपुरवठा खंडित

शेलारवाडी : काल श्री क्षेत्र घोरावडेश्वर येथे शिवमंदिरासमोर अचानक एक मोठा दगड कोसळल्याने अपघात घडला. या घटनेत एक व्यक्ती जखमी झाला असून त्याला तात्काळ पिंपरी येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

दगड कोसळल्यामुळे मंदिरासमोरील बॅरिगेटिंग तसेच वीजपुरवठा करणारी मुख्य केबल यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी, मंदिर परिसरातील वीजपुरवठा कालपासून खंडित झाला होता.

दरम्यान, आज देवस्थानाचे मुख्य महंत योगी अमरनाथ बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली बॅरिगेटिंगची दुरुस्ती करण्यात आली. तसेच इलेक्ट्रीशियनच्या मदतीने पोलपासून मंदिरापर्यंतची संपूर्ण लाईन तपासून वायरिंगचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

स्थानिक ग्रामस्थ आणि भक्तांच्या सहकार्याने हे काम जलद गतीने पार पडले असून, लवकरच मंदिर परिसरातील वीजपुरवठा सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

या दुर्घटनेनंतर देवस्थान समितीकडून भाविकांना सुरक्षिततेचे आवाहन करण्यात आले असून, पावसाळ्यात डोंगर उतारांवरील दगडसरींचा धोका लक्षात घेऊन खबरदारी घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!