Homeक्राईमलोणावळ्यात एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी; पोलिस गस्त कमी झाल्याने चोरट्यांचे फावले

लोणावळ्यात एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी; पोलिस गस्त कमी झाल्याने चोरट्यांचे फावले

लोणावळ्यात एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी; पोलिस गस्त कमी झाल्याने चोरट्यांचे फावले

लोणावळा : शहरातील नांगरगाव परिसरात मंगळवारी रात्री तीन ठिकाणी चोऱ्यांच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साधना रेसिडेन्सी बिल्डिंगमधील राजू खांडेभराड यांच्या बंद फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे लॉक तोडून सुमारे ३० हजार रुपयांची रोकड आणि दीड तोळे सोने चोरून नेले आहे. चोरट्यांनी घरातील इतर साहित्याचीही तोडफोड केली आहे.

याच परिसरातील दत्त सोसायटी मधील श्रीमती कोळकर आणि अनघा कुलकर्णी यांच्या बंगल्यांमध्येही चोरी झाल्याची माहिती मिळाली आहे. तर भालेकर यांच्या घरात चोरीचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे.

या तीनही घटनांमध्ये तीन अज्ञात चोरट्यांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. लोणावळा शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे काम सुरू आहे.

Oplus_16908288

स्थानिक नागरिकांच्या मते, अलीकडे शहरातील रात्रीची पोलीस गस्त कमी झाल्याने अशा प्रकारच्या चोरीच्या घटना वाढत आहेत. काही काळापूर्वी शहर पोलिसांकडून रात्रभर गस्त घातली जात होती, तसेच सोसायट्यांमधील सुरक्षारक्षकांशी समन्वय साधून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले जात होते. मात्र, सध्या ही गस्त कमी झाल्याने चोरट्यांना मोकळे रान मिळत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!