शालेय साहित्य व बसकर वाटप सह्याद्री विद्यार्थी अकादमीचा उपक्रम
कामशेत:सह्याद्री विद्यार्थी अकादमी, मावळ यांच्या वतीने शिळीब येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सह्याद्रीचे दुर्गसेवक कै. भाऊ ढाकोळ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विद्यार्थ्यांसाठी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना बसण्यासाठी नव्या बसकऱ्यांचाही संच प्रदान करण्यात आला, अशी माहिती दुर्गसेवक सचिन शेडगे यांनी दिली.

सह्याद्री विद्यार्थी अकादमीच्या वतीने दरवर्षी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येते. यासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा साहित्यही देण्यात येते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल उत्साह वाढविण्याचा हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.


या प्रसंगी सचिन शेडगे, पत्रकार चेतन वाघमारे, केदार डाकवे, रवींद्र शिंदे, दर्शन वाघवले आणि प्रश्नन पार्ट आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर दळवी यांनी केले, तर आभार सुनीता देशमुख आणि दिनेश चोरगे यांनी मानले.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११



















