Homeताज्या बातम्याप्रवेशबंदी तोडून आलेला ट्रेलर ईगल कंपनीजवळ अनियंत्रित मोठी दुर्घटना टळली

प्रवेशबंदी तोडून आलेला ट्रेलर ईगल कंपनीजवळ अनियंत्रित मोठी दुर्घटना टळली

प्रवेशबंदी तोडून आलेला ट्रेलर ईगल कंपनीजवळ अनियंत्रित मोठी दुर्घटना टळली

तळेगाव दाभाडे : तळेगाव–चाकण महामार्गावर मंगळवाल दि २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ईगल कंपनीच्या गेटसमोर भीषण अपघाताची घटना घडली. प्रवेशबंदी असूनही चाकणच्या दिशेने जाणारा एक ट्रेलर अचानक ताबा सुटल्याने सॅमसन चाळीच्या भिंतीवर जोरदार धडकला. धडक बसताच ट्रेलर काही अंतर मागे सरकला आणि धुळीचा प्रचंड लोळ उडाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. जवळून जात असलेल्या दुचाकीस्वाराचा थरकाप उडाला असला तरी तो किरकोळ बचावला.

घटनेच्या वेळी महामार्गावरून येणाऱ्या इतर वाहनचालकांनी अचानक धुळीचा ढग रस्त्याच्या मध्यभागी उठताना पाहिला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत त्यांनी गाडी बाजूला घेत तातडीने वेग कमी केला. अन्यथा मोठा चेन-अप कोसळून गंभीर अपघात घडण्याची शक्यता होती. स्थानिक नागरिकांनी तत्काळ एकमेकांना सतर्क केले. घटनास्थळी काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. ट्रेलर मात्र धडक दिल्यानंतर चालकासहित पसार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

या संपूर्ण परिसरात मोठ्या वाहनांच्या प्रवेशबंदीचे आदेश पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांनी दिले असतानाही काही ट्रेलर आणि भारी वाहने नियम मोडून या मार्गावरून सर्रास धावत असल्याची तक्रार नागरिकांनी व्यक्त केली. स्वराजनगरीच्या नाकाबंदीवरच अशा वाहनांना रोखले गेले पाहिजे, असे मत स्थानिकांनी नोंदवले.

“फक्त कारवाईचे आश्वासन नको; प्रवेशबंदीची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे. अशा वाहनांना नाकाबंदीच्या ठिकाणावरून पुढे येऊच देऊ नये, अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना होऊ शकते,” अशी भूमिका सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस यांनी व्यक्त केली. परिसरातील नागरिकांनीही याला जोरदार पाठिंबा देत वाहतूक विभागाने अधिक कडक नियंत्रण ठेवावे, अशी मागणी केली.

अपघातानंतर स्थानिकांनी महामार्गावरील सीसीटीव्ही तपासून ट्रेलरचा शोध घेण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी फरार ट्रेलरचा शोध सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!