Homeताज्या बातम्यामावळ तालुक्याचे विकासाचे व्हिजन म्हणजे आमदार सुनील शेळके – तालुकाध्यक्षा सुवर्णा राऊत

मावळ तालुक्याचे विकासाचे व्हिजन म्हणजे आमदार सुनील शेळके – तालुकाध्यक्षा सुवर्णा राऊत

मावळ तालुक्याचे विकासाचे व्हिजन म्हणजे आमदार सुनील शेळके – तालुकाध्यक्षा सुवर्णा राऊत

मावळ | प्रतिनिधी मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचा ठोस चेहरा म्हणजे आमदार सुनील शेळके असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुकाध्यक्षा सुवर्णा राऊत यांनी केले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या. मावळ तालुक्याच्या आजवरच्या इतिहासात सर्वाधिक निधी आणून विकासकामे करणारे नेतृत्व म्हणून आमदार सुनील शेळके यांची ओळख असून, त्यांच्या पाठीशी मावळ तालुक्यातील सर्व माता-भगिनी ठामपणे उभ्या असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सुवर्णा राऊत म्हणाल्या की, आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली मावळ तालुक्यात रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, क्रीडा सुविधा, ग्रामविकास अशा विविध क्षेत्रांत भरीव काम झाले आहे. कोट्यवधींचा निधी तालुक्यात आणून तो थेट विकासकामांमध्ये खर्च करण्यात आला. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून आला आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी महिलांनी कंबर कसली असून, या निवडणुकीत महिला मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “मावळ तालुक्यातील माता-भगिनी विकासाचे काम पाहून जागरूक झाल्या आहेत. त्या केवळ मतदानापुरत्याच मर्यादित न राहता प्रचार, संघटन आणि जनसंपर्कातही सक्रियपणे सहभागी होत आहेत,” असे राऊत यांनी सांगितले.

यावेळी बोलताना त्यांनी विश्वास व्यक्त केला की, येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, आर.पी.आय. आणि एस.आर.पी. या महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे उमेदवार मोठ्या बहुमताने निवडून येतील. जिल्हा परिषदेच्या पाचही जागा आणि पंचायत समितीच्या दहा जागांवर आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असा ठाम दावा त्यांनी केला.

“विकासाचे व्हिजन, सक्षम नेतृत्व आणि जनतेचा विश्वास या तीन गोष्टींमुळे आमदार सुनील शेळके मावळ तालुक्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालीच मावळचा पुढील विकासाचा प्रवास अधिक गतीने सुरू राहील,” असे मत सुवर्णा राऊत यांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!