Homeराजकीयमावळात भाजपची कोंडी? अल्प प्रतिसादामुळे मुख्यमंत्री–केंद्रीय मंत्र्यांना प्रचारासाठी साकडे

मावळात भाजपची कोंडी? अल्प प्रतिसादामुळे मुख्यमंत्री–केंद्रीय मंत्र्यांना प्रचारासाठी साकडे

मावळात भाजपची कोंडी? अल्प प्रतिसादामुळे मुख्यमंत्री–केंद्रीय मंत्र्यांना प्रचारासाठी साकडे

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वारे आता प्रचंड वेगाने वाहू लागले असून, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या प्रमुख पक्षांकडून प्रचाराचा धडाका सुरू आहे. मात्र, प्रचाराच्या गदारोळामागे दडलेलं राजकीय वास्तव पाहिलं असता भाजपसमोर मोठं आव्हान उभं ठाकल्याचं चित्र दिसून येत आहे. स्थानिक पातळीवर भाजपच्या नेत्यांना मिळणारा अल्प प्रतिसाद आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडे झुकणारा वाढता जनकल यामुळे मावळातील राजकीय समीकरणं झपाट्याने बदलताना दिसत आहेत.

२०१९ साली आमदार सुनील शेळके पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर २०१९ ते २०२४ या कालावधीत त्यांनी जनसामान्यांच्या प्रश्नांवर तत्परतेने काम करत विकासाचा ठसा उमटवला. याच कामांच्या बळावर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा मावळची आमदारकी मिळवली. विशेष म्हणजे, या निवडणुकीत एकीकडे एकटे आमदार सुनील शेळके आणि दुसरीकडे भाजपसह जवळपास सर्वच पक्षांचा पाठिंबा असलेला अपक्ष उमेदवार असं समीकरण असतानाही शेळके यांनी तब्बल एक लाखांहून अधिक मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला. या निकालाने मावळ तालुक्यात शेळके यांची राजकीय ताकद किती भक्कम आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं.

राज्यातील युती तालुक्यातही कायम राहावी, जनसामान्य केंद्रस्थानी राहावा आणि कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष टाळावा, या उद्देशाने आमदार सुनील शेळके यांच्या वतीने तळेगाव दाभाडे नगरपरिषद, लोणावळा नगरपरिषद आणि वडगाव नगरपंचायत निवडणुकांदरम्यान माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांना सोबत येण्याची विनंती करण्यात आली होती. हा प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनीही मान्य केला होता. मात्र, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी या प्रस्तावात गौडबंगाल करत शेळके यांची दिशाभूल केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. परिणामी, प्रस्ताव अमान्य झाला आणि लोणावळा नगरपरिषद व वडगाव नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता, तसेच तळेगाव दाभाडेमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दहा हजारांहून अधिक मताधिक्याने विजयी होईल, ही आमदार शेळके यांची भविष्यवाणी अक्षरशः खरी ठरली.

याच पार्श्वभूमीवर आता येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी भाजपकडून वेगळीच रणनीती आखली जात असल्याचं दिसत आहे. स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद देत नसल्याचं लक्षात आल्यानंतर भाजपकडून थेट राज्य व केंद्रातील मोठ्या नेत्यांना प्रचारासाठी उतरवण्याची तयारी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्र्यांना मावळात प्रचारासाठी बोलावण्याची धडपड सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे.

मात्र, राजकीय विश्लेषक आणि नागरिक या हालचालीकडे स्थानिक नेतृत्वाच्या अपयशाच्या नजरेने पाहत आहेत. ‘कार्यकर्ते माझं ऐकतात, संघटना माझ्या हातात आहे,’ असा दावा करणाऱ्या भाजप नेत्यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. स्थानिक पातळीवर संघटना सक्षम असती, तर जिल्हा परिषद–पंचायत समितीसारख्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांना पाचारण करण्याची वेळ आली नसती, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

याआधी लोणावळा नगरपालिकेच्या निवडणुकीतही बाहेरून आलेले आमदार आणि राज्यमंत्री प्रचारासाठी उतरले होते. मात्र, नागरिकांनी त्याकडे फारसं लक्ष न देता आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसला एकहाती सत्ता बहाल केली होती. तसंच चित्र पुन्हा एकदा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दिसेल, या भीतीपोटीच भाजपकडून मोठ्या नेत्यांची फौज उतरवली जात असल्याचं बोललं जात आहे.

एकीकडे राष्ट्रवादीकडे वाढता जनसमर्थनाचा कल आणि दुसरीकडे भाजपच्या स्थानिक नेत्यांना मिळणारा अल्प प्रतिसाद — या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. मतदार भाजपला ‘अंजन’ दाखवणार की पुन्हा एकदा विकासाच्या मुद्यावर कौल देणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट...

सह्याद्री नामा न्यूज | वडगाव मावळ | प्रतिनिधी मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट करण्यावर भर मावळ तालुक्यात...

error: Content is protected !!