Homeमनोरंजनशालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी

मावळ : मावळ तालुक्यातील उर्से येथे आयोजित करण्यात आलेल्या शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसे गावातील ओंकार सचिन ठाकर याने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकाची कमाई केली. ओंकार हा येळसे येथील पवना विद्या मंदिर विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असून, शिक्षणासोबतच कुस्तीच्या मैदानावरही त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच मावळ तालुका क्रीडा शिक्षक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. उर्से येथील जय बजरंग तालीम, श्री पद्मावती मंदिर परिसरात ही स्पर्धा पार पडली.

या स्पर्धेत मावळ तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ओंकारने आपल्या गटातील प्रतिस्पर्ध्यांशी जोरदार लढत देत कुस्तीचे उत्कृष्ट डावपेच सादर केले. आत्मविश्वास, ताकद, चपळाई आणि नियमित सरावाच्या जोरावर त्याने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत प्रथम क्रमांक पटकावला.

ओंकार सध्या इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असून, दहावीच्या अभ्यासासोबतच कुस्तीच्या सरावावरही तो विशेष लक्ष देत आहे. नियमित सराव, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर तालुकास्तरीय स्पर्धेत मिळविलेले हे यश विशेष कौतुकास्पद ठरले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही आपली गुणवत्ता सिद्ध करावी, याचे ओंकारचे यश उदाहरण ठरले आहे.

ओंकारच्या या यशाबद्दल नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री संजय तथा बाळा भेगडे,व संस्थेचे सचिव व शालेय समितीचे अध्यक्ष संतोष खांडगे, मुख्याध्यापक शितल शेटे व पर्यवेक्षक रोशनी मराडे यांनी त्याचे अभिनंदन केले.

ओंकारला कुस्तीच्या सरावासाठी शाळेतील शिक्षक गणेश ठोंबरे, राजकुमार वरघडे, भारत काळे, सुनिता कळमंकर, ज्योती कोंडभर, सुप्रिया पुंडले व निकीता काळे यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षकांच्या मार्गदर्शनासोबतच कुटुंबीय आणि ग्रामस्थांकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे ओंकारने हे यश संपादन केले.

ओंकारच्या या यशामुळे येळसे गावासह पवना विद्या मंदिर विद्यालयाचे नाव क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल झाले आहे. त्याच्या यशाबद्दल विद्यालयातील शिक्षक, कुटुंबीय, ग्रामस्थ आणि मित्रपरिवाराकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा क्षेत्राची आवड निर्माण होण्यासाठी अशा शालेय स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरत आहेत. ओंकारच्या या यशामुळे परिसरातील युवा खेळाडूंनाही प्रेरणा मिळणार असून, आगामी जिल्हास्तरीय व इतर स्पर्धांमध्ये त्याने उल्लेखनीय कामगिरी करावी, अशा शुभेच्छा त्याला देण्यात आल्या

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नातून तळेगाव आगाराला नव्या बसेसची भेट; आगारातील बसेसची संख्या ४३...

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ मावळच्या एसटी सेवेला ‘जिजाऊ’ची साथ; पाच नव्या स्मार्ट बसेसचे लोकार्पण   आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नातून तळेगाव आगाराला नव्या बसेसची भेट;...

error: Content is protected !!