Homeआरोग्यमावळातील नागरिकांसाठी दिलासादायक सुविधा : कान्हे फाटा येथे उद्यापासून मोफत डायलिसीस उपचार...

मावळातील नागरिकांसाठी दिलासादायक सुविधा : कान्हे फाटा येथे उद्यापासून मोफत डायलिसीस उपचार सुविधा – आमदार शेळके

मावळातील नागरिकांसाठी दिलासादायक सुविधा : कान्हे फाटा येथे उद्यापासून मोफत डायलिसीस उपचार सुविधा – आमदार शेळके

वडगाव मावळ (कान्हे), १४ मे : मावळ तालुक्यातील मूत्रपिंड विकारांनी ग्रस्त रुग्णांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक सुविधा सुरू करण्यात आली आहे. उपजिल्हा रुग्णालय वडगाव मावळ (कान्हे) येथे उद्या, गुरुवार, दि. १५ मे २०२५ पासून मोफत डायलिसीस सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे, अशी घोषणा मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केली.

ही उपयुक्त सेवा सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन, आमदार सुनील शेळके, पॉस्को, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे, आणि जी. के. फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त प्रयत्नातून सुरू होत आहे.

डायलिसीस सेवा सोमवार ते शुक्रवार दरम्यान, सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना त्यांच्या उपचारांचा मोठा आधार मिळणार आहे.

उपचारासाठी आवश्यक सूचना

१) उपचारासाठी येण्यापूर्वी 8080346234 या क्रमांकावर संपर्क करून आपल्या आजाराची माहिती द्यावी व अपॉइंटमेंट घेऊनच रुग्णालयात यावे.

२) रुग्णाने येताना खालील कागदपत्रांची झेरॉक्स प्रत सोबत आणावी :

आजारासंबंधीचे सर्व वैद्यकीय अहवाल / कागदपत्रे

 रेशन कार्ड

 आधार कार्ड

या उपक्रमासाठी मावळचे आमदार मा. सुनिल शंकरराव शेळके यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. त्यांच्या पुढाकारामुळे मावळ परिसरातील रुग्णांना स्थानिक स्तरावर सुसज्ज व मोफत उपचाराची सोय उपलब्ध झाली आहे.

ही सेवा मावळ तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी खुली असून गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!