Homeमहत्त्वाचेNH48 मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गाचा विस्तार व दुरुस्ती करण्याची खासदार श्रीरंग बारणे...

NH48 मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गाचा विस्तार व दुरुस्ती करण्याची खासदार श्रीरंग बारणे यांची महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

NH48 मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गाचा विस्तार व दुरुस्ती करण्याची खासदार श्रीरंग बारणे यांची महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

मुंबई : पुणे राष्ट्रीय मार्गावरील प्रचंड वाहतूक, खड्ड्यांची दयनीय स्थिती आणि अरुंद रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून याचा ( NH-48) नागरिकांवर प्रतिकूल परिणाम होत असल्याने या महामार्गाचा तातडीने विस्तार व दुरुस्ती करण्याची मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची श्रीरंग बारणे यांनी दिल्लीत घेतली भेट येऊन हि समस्या मांडली.

खासदार बारणे यांनी यावेळी सांगितले की, पुणे हे राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असून ते अनेक महत्त्वाच्या शहरांशी जोडले गेले आहे. मात्र, NH-48 च्या सध्याच्या अवस्थेमुळे पुणे आणि परिसरातील नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः कार्ले फाटा, वडगाव फाटा, तळेगाव फाटा आणि देहूरोड फाटा या ठिकाणी उड्डाणपूलांची गरज असून, त्यांची उभारणी ( NH-48) तातडीने झाली पाहिजे.

तसेच, महामार्गाची लेन वाढवणे, रस्ते दुरुस्ती करणे आणि आधुनिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली लागू करणेही आवश्यक आहे. या मार्गाच्या सुधारित कामांमुळे प्रवास अधिक सुरक्षित, जलद व सुलभ होईल, व्यापाराला गती मिळेल आणि अपघातांचे प्रमाणही कमी होईल. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ हा मुंबईपासून सुरू होऊन पुणे, सातारा, कोल्हापूर, बेंगळुरूमार्गे चेन्नईपर्यंत जातो. ( NH-48) या मार्गावरील प्रचंड वाहतूक, खड्ड्यांची दयनीय स्थिती आणि अरुंद रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, व्यापार व दळणवळणावरही प्रतिकूल परिणाम होत आहे .खासदार बारणे यांनी या भागाच्या औद्योगिक, सामाजिक आणि नागरी विकासासाठी NH-48 च्या विस्तार, दुरुस्ती व पायाभूत सुधारणा तातडीने व्हाव्यात, अशी मागणी यावेळी केली.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!