Homeशिक्षण-प्रशिक्षणआम्ही सांगू त्या दुकानातूनच शालेय वस्तू खरेदी करा. तळेगावातील खाजगी शाळांची मनमानी

आम्ही सांगू त्या दुकानातूनच शालेय वस्तू खरेदी करा. तळेगावातील खाजगी शाळांची मनमानी

तळेगाव दाभाडे : शहरासह मावळ तालुक्यातील अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळा आम्ही सांगू त्या दुकानातूनच शालेय वस्तू. गणवेश खरेदी करा अशा प्रकारे या शाळा मनमानी करत असून पालकांना वेठीस धरण्याचे काम या खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा करत आहेत. असा आरोप तळेगाव सह मावळ तालुक्यातील अनेक नागरिकांनी केला आहे.

या संदर्भात तळेगाव दाभाडे चे माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते अरुण बबनराव माने, माहिती अधिकार कार्यकर्ते जयवंतराव कदम यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे, आमदार, जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी, मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या माध्यमातून निवेदन पाठवण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पालकांनी त्यांच्या पाल्यासाठी वह्या पुस्तके गणवेश शालेय वस्तू शाळेतूनच किंवा आम्ही सांगू त्या दुकानातूनच घ्यावेत. अशी सक्तीच या इंग्रजी माध्यमाच्या बहुसंख्य शाळा करत आहेत. त्याद्वारे या शाळा आणि विक्रेते नफेखोरी करत आहेत. अवास्तव दरात शालेय साहित्य विक्री होत असल्याने पालकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

या शाळांवर प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.या संदर्भात बोलताना माजी नगरसेवक अरुण माने म्हणाले की या इंग्रजी माध्यमांच्या शिक्षण संस्थेने पालकांकडे विशिष्ट दुकानातूनच गणवेश व शालेय वस्तूंची खरेदी करण्याची सक्ती करणे चुकीचे आहे. या चुकीच्या प्रकारांना आमचा नेहमीच विरोध राहिला आहे. या शिक्षण संस्थांना कधी चाप बसणार? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

प्रतिनिधी = गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!