Homeक्राईमइंदोरीत पोलिसांची धडक कारवाई; 28 हजारांचा गांजा जप्त

इंदोरीत पोलिसांची धडक कारवाई; 28 हजारांचा गांजा जप्त

इंदोरी(मावळ)जांबवडे रोड, इंदोरी परिसरात तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी केलेल्या अचूक कारवाईत 28,784 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सलीम हुसेन मुजावर (वय 63, रा. साईनगर, इंदोरी – भाडेकरू) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा रजि. नं. 286/2025, एन.डी.पी.एस. अ‍ॅक्ट कलम 8(क), 20(ब)(त्त)(अ) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी सुमारे 6.50 वाजता तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास पथकाला आरोपीकडे बेकायदेशीररीत्या गांजा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने जांबवडे रोडवरील साहेबराव काशीद यांच्या चाळीजवळ सापळा रचून धाड टाकली. कारवाई दरम्यान आरोपी सलीम मुजावर याच्या ताब्यातून 544.68 ग्रॅम गांजा (किंमत 27,234 रुपये) तसेच 1,550 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 28,784 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गांजा कोठून आणला याबाबत आरोपीकडून चौकशी करण्यात आली; मात्र त्याने कोणतीही माहिती न देता चौकशीस सहकार्य केले नाही, असे पोलिसांनी सांगितले.

ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोआ शशीकांत महावरकर, अप्पर पो.आयुक्त सारंग आवाड, पोउप आयुक्त विशाल गायकवाड आणि सहाय्यक पो.आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

प्रत्यक्ष कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोउपनिरीक्षक दिपक खरात, पोहवा अनंत रावण, वसीम शेख, पोशि. विनायक शेरमाळे, भिमराव खिलारे, गणेश दरदळे आणि रमेश घुले यांनी सहभाग घेतला. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.=मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!