Homeशिक्षण-प्रशिक्षणउद्योजक व्हायचे असेल तर नव उद्योजकांनी प्रशिक्षणाबरोबरच जिद्द आणि कठोर परिश्रम करावे...

उद्योजक व्हायचे असेल तर नव उद्योजकांनी प्रशिक्षणाबरोबरच जिद्द आणि कठोर परिश्रम करावे तरच यश मिळते ज्येष्ठ पत्रकार सुरेश साखवळकर 

उद्योजक व्हायचे असेल तर नव उद्योजकांनी प्रशिक्षणाबरोबरच जिद्द आणि कठोर परिश्रम करावे तरच यश मिळते ज्येष्ठ पत्रकार सुरेश साखवळकर 

वराळे : मावळ तालुक्यातील वराळे येथे असणाऱ्या ग्रामीण विकास व स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था(रुड सेट संस्था ) यांच्या वतीने आयोजित सीसीटीव्ही दुरुस्ती व देखभाल या १३ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी साप्ताहिक अंबरचे संपादक ज्येष्ठ पत्रकार सुरेश साखवळकर बोलत होते.

यावेळी साखवळकर यांनी नव उद्योजकांना संबोधित केले. यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर नवउद्योजकांनी प्रशिक्षणाबरोबरच जिद्द आणि कठोर परिश्रम करावे तरच यश मिळते रुड सेट संस्था ही शेतीपूरक तसेच बिगर शेती आधारित व्यवसायाचे प्रशिक्षण गेली सत्तावीस वर्ष देत असून महाराष्ट्राला उद्योजक पुरवण्याचे काम करत आहे.

ही खूप अभिमानाची गोष्ट आहे एखाद्या व्यवसायाचे कौशल्य विकसित करण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक असते असे सुरेश साखवळकर यांनी म्हटले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे संचालक राजकुमार बिरादार, तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष अतुल पवार, सचिव सोनबा गोपाळे (गुरुजी) ज्येष्ठ पत्रकार बी एम भसे, सुनील वाळुंज हे व्यासपीठावर उपस्थित होते.

नवउद्योजक घडवण्यासाठी आमची संस्था अतिशय दक्षपणे काम करत असून नवउद्योजकांना उभे करण्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ तसेच आवश्यक असलेले प्रोजेक्ट रिपोर्ट. मार्केटिंग याबाबतचे विनामूल्य मार्गदर्शन करत असते असे संचालक राजकुमार बिरादार यांनी यावेळी सांगितले.

पत्रकार संघाचे अध्यक्ष अतुल पवार, सचिव सोनबा गोपाळे( गुरुजी) यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन करून त्यांच्या नव्या उद्योगाला शुभेच्छा दिल्या. या प्रशिक्षणासाठी पुणे जिल्ह्यातून वेगवेगळ्या तालुक्यातून ३५ विद्यार्थी उपस्थित असून संस्थेतर्फे त्यांना मोफत शिक्षण, राहण्याची व्यवस्था, व भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.

या कार्यक्रमासाठी पत्रकार राजेंद्र जगताप, मनोहर दाभाडे, श्रीकांत चिपे, रजनी पानकर, शैलजा फुलकर, ज्येष्ठ पत्रकार धांडे सर, गणेश भेगडे हे मान्यवर देखील या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते. संस्थेच्या योगिता गरुड, रवी घोजगे, बाळू अवघडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश निळकंठ यांनी केले. प्रास्ताविक प्रशिक्षक संदीप पाटील यांनी केले तर आभार रवी घोजगे यांनी मानले.

प्रतिनिधी = गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!