कान्हे फाटा येथील सरकारी रुग्णालयात सुविधांचा अभाव वंचित बहुजन युवा आघाडी मावळच्या पुढाकारानंतर तातडीने दखल घेत रुग्णालयातील त्रुटी दूर करण्यास सुरुवात केली.
कामशेत : मावळ तालुक्यातील कान्हे फाटा येथील सरकारी उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक सुविधा जसे की डॉक्टर. कर्मचारी व यंत्रसामुग्रीचा अभाव असल्याचे वास्तव वंचित बहुजन युवा आघाडी मावळचे युवा अध्यक्ष संदीप कदम यांनी उघड केले आहे.
त्यांच्या पुढाकारानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत रुग्णालयातील त्रुटी दूर करण्यास सुरुवात केली आहे. वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष संदीप कदम हे सोमवार दिनांक २३ जून २०२५ रोजी आपल्या मुलीच्या उपचारासाठी कान्हे फाटा येथील सरकारी उपजिल्हा रुग्णालयात गेले असता. तेथे इंजेक्शन उपलब्ध नसल्याने ते बाहेरून आणावे लागले तसेच इतर अनेक असुविधाही त्यांच्या लक्षात आल्या त्याबाबत त्यांनी त्वरित रुग्णालय प्रशासनाशी या विषयावर चर्चा केली व माध्यमातून माहिती दिली.
या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन दुसऱ्याच दिवशी पुणे जिल्हा रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ वंदना जोशी, वडगाव मावळ उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ बी. आर. पाटील, बालरोगतज्ञ डॉ भूषण बेडेकर आणि वैद्यकीय अधिकारी संकेत मळेकर यांनी कान्हे फाटा येथील सरकारी उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली.
यावेळी वंचित बहुजन आघाडी मावळ तालुका अध्यक्ष नितीन ओव्हाळ, युवा आघाडी अध्यक्ष संदीप कदम, महिला आघाडी अध्यक्षा मनीषा ओव्हाळ, माजी अध्यक्ष बाळकृष्ण टपाले, ज्येष्ठ नेते शंकर कदम, उपाध्यक्ष निलेश टपाले, सचिव लहू लोखंडे, महासचिव अक्षय साळवे, वडगाव शहर उपाध्यक्ष पवन उदागे, युवा नेते सुमित साळवे, युवा सचिव प्रवीण गायकवाड हे उपस्थित होते.
शासकीय अधिकाऱ्यांनी रुग्णालयातील असणाऱ्या त्रुटी दूर करण्याचे आश्वासन यावेळी वंचित बहुजन आघाडी मावळ तालुक्याच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या असून. रुग्णालयातील सर्व सेवा सुरळीत करण्यात आल्या आहेत. कोणालाही रुग्णालयाविषयी अडचण आल्यास वंचित बहुजन युवा आघाडीशी संपर्क साधण्याचे आवाहन युवा आघाडीचे अध्यक्ष संदीप कदम यांनी केले आहे.
प्रतिनिधी = गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११




















