Homeसामाजिककिल्ले लोहगडावर विजय दिनाचे आयोजन

किल्ले लोहगडावर विजय दिनाचे आयोजन

किल्ले लोहगडवर विजय दिनाचे आयोजन

भाजे : छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदाना नंतर स्वराज्यातील अनेक किल्ले मुघलांकडे गेले होते. मुघल सरदार मन्सूर खान बेग याने मराठ्यांच्या ताब्यातून दगलबाजीने लोहगड किल्ला हस्तगत केला. त्यानंतर मन्सूर खान बेग याने एका मुघल सरदाराची लोहगडावर किल्लेदार म्हणून नियुक्ती केली होती.

या मुघल किल्लेदाराने आई एकविरा देवीच्या मंदिराचा काही भाग उध्वस्त केला होता. याचा बदला घेण्यासाठी इ स १६९२ मधील श्रावण महिन्यात मराठा सरदार नावजी बलकवडे आणि मराठा सरदार विठोजी कारके यांनी भर पावसात या मुघल किल्लेदारावर हल्ला करून लोहगड जिंकून घेतला आणि त्या अत्याचारी किल्लेदाराचा शिरच्छेद करून त्याचे शीर आई एकविरेला अर्पण करून सूड घेतला.

या पवित्र स्मृतिदिनानिमित्त गुरुवार दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी किल्ले लोहगडावर विजय दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९: वाजता लोहगडावरील महादेवाला अभिषेक व पूजा होणार आहे. सकाळी १०: वाजता लोहगड प्रवेशद्वार ते शिवस्मारक या मार्गावर ढोल ताशाच्या गजरात पालखी मिरवणूक निघेल. दुपारी ११: वाजता मान्यवरांचे स्वागत व प्रस्ताविक. दुपारी ११:१५ मान्यवरांचे मार्गदर्शन. दुपारी १२:३० महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

असून ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, रायगड स्मारक समितीचे सचिव सुधीर थोरात, इतिहास संशोधक डाॅ प्रमोद बोराडे, इतिहास संशोधक अॅड. रवींद्र यादव, लोहगड विसापूर विकास मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे, शिवव्याख्याते प्राध्यापक प्रदीप कदम, शिवदुर्ग रेस्क्यू चे सुनील गायकवाड, हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.

तरी लोहगड विजय दिनाला शिवभक्तांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री रायगड स्मारक मंडळ, सरदार नावजी बलकवडे स्मृती प्रतिष्ठान, सरदार विठोजी कारके स्मृती प्रतिष्ठान यांनी केले आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!