Homeताज्या बातम्याकॉमनवेल्थ बुद्धिबळात अन्वी हिंगेचा ऐतिहासिक डंका; उज्वल कामगिरीने भारताचा झेंडा उंच

कॉमनवेल्थ बुद्धिबळात अन्वी हिंगेचा ऐतिहासिक डंका; उज्वल कामगिरीने भारताचा झेंडा उंच

कॉमनवेल्थ बुद्धिबळात अन्वी हिंगेचा ऐतिहासिक डंका; उज्वल कामगिरीने भारताचा झेंडा उंच

तळेगाव दाभाडे : क्वालालंपूर (मलेशिया) येथे पार पडलेल्या कॉमनवेल्थ चेस चॅम्पियनशिप २०२५ मध्ये पुण्याच्या अवघ्या आठ वर्षांच्या अन्वी दिपक हिंगे हिने अभूतपूर्व कामगिरी करून गर्ल्स अंडर-८ गटात रौप्यपदकाची कमान आपल्या नावे केली. जगातील ३५ हून अधिक देशांतील शेकडो स्पर्धकांमध्ये तिने दाखवलेली सातत्यपूर्ण बुद्धिबळ गुणवत्ता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तिच्या क्षमतेचा ठसा उमटवणारी ठरली.

या प्रतिष्ठित स्पर्धेत अन्वीने ९ पैकी तब्बल ८ गुणांची कमाई करत थरारक आघाडी राखली. विजेत्याइतकेच गुण मिळूनही टायब्रेकच्या फरकामुळे तिला रौप्यपदक प्राप्त झाले; मात्र गुणसंख्येनुसार ती संयुक्त विजेती ठरली. चिंचवड येथील एलप्रो इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी असलेली अन्वी अल्पवयात जागतिक पातळीवर खेळाचे तंत्र, संयम आणि अचूकता यांचे असामान्य प्रदर्शन करत आहे.

स्पर्धेनंतर आनंद व्यक्त करताना अन्वी म्हणाली,

“भारतासाठी खेळणे हा माझ्यासाठी सर्वात मोठा अभिमान आहे. प्रत्येक डाव मी मनापासून खेळले. आता आणखी चांगले करण्याची प्रेरणा मला मिळाली आहे.”

अन्वीचे वडील दिपक हिंगे म्हणाले, “तिच्या मेहनतीचा आणि चिकाटीचा परिणाम आम्ही आज जगभर पाहतो आहोत. तिच्या प्रत्येक यशाने आम्ही अभिमानाने भरून जातो.”

आई आरती हिंगे म्हणाल्या, “अभ्यास, सराव आणि प्रवास यातील संतुलन ती ज्या पद्धतीने राखते ते कौतुकास्पद आहे. तिची जिद्द प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.”

प्रशिक्षक प्रतीक मुळे यांनी सांगितले,

“अन्वीचा खेळ तिच्या वयापेक्षा खूप पुढचा आहे. तिच्यातील सातत्य आणि शिकण्याची वृत्ती तिला भविष्यात मोठी यशं मिळवून देईल.”

गेल्या काही महिन्यांत अन्वीने वर्ल्ड कॅडेट अ‍ॅण्ड यूथ रॅपिड चॅम्पियनशिप (ग्रीस) मध्ये Vice World Champion (U8) किताब मिळवला; तर वेस्टर्न एशिया चॅम्पियनशिपमध्ये २ सुवर्ण व ४ रौप्य पदकांसह भारतासाठी सर्वाधिक पदकांची कमाई केली.

अन्वीच्या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सुनील शेळके यांनी तिचा सत्कार करत प्रतिभेला सलाम केला. सध्या ती बँकॉक येथे होणाऱ्या एशियन युथ चेस चॅम्पियनशिप (२०–३० नोव्हेंबर २०२५) साठी सज्ज होत असून देशभरातील क्रीडाप्रेमी तिच्या पुढील कामगिरीकडे आशेने पाहत आहेत.

प्रतिनिधी.गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!