Homeसामाजिकजागतिक पोस्ट ऑफिस दिनानिमित्त तळेगाव स्टेशन पोस्ट ऑफिसमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर

जागतिक पोस्ट ऑफिस दिनानिमित्त तळेगाव स्टेशन पोस्ट ऑफिसमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर

जागतिक पोस्ट ऑफिस दिनानिमित्त तळेगाव स्टेशन पोस्ट ऑफिसमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर

तळेगाव दाभाडे : जागतिक पोस्ट ऑफिस दिनानिमित्त तळेगाव स्टेशन येथील यशवंत नगर पोस्ट ऑफिसमध्ये सुखद होमिओपॅथिक क्लिनिकतर्फे पोस्ट विभागातील कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सतत लोकसेवा करणाऱ्या टपाल कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे महत्त्व ओळखून हा उपक्रम राबविण्यात आला.

Oplus_16908288

या शिबिरात रक्तदाब, मधुमेह तपासणी, वजन–उंची प्रमाण तपासणी, जीवनशैलीविषयक सल्ला तसेच होमिओपॅथिक आरोग्य मार्गदर्शन करण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामाच्या स्वरूपामुळे होणारा मानसिक ताण, झोपेची कमतरता व चुकीच्या आहाराच्या सवयींबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

सुखद होमिओपॅथिक क्लिनिकच्या संस्थापक डॉ. सायली देबडवार फुटाणे यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधत नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, “आरोग्याची काळजी घेणे ही प्रत्येकाची स्वतःशी असलेली जबाबदारी आहे. नैसर्गिक, संतुलित आहार व नियमित व्यायामाने अनेक आजार टाळता येतात.”

Oplus_16908288

यशवंत नगर पोस्ट ऑफिस अंतर्गत येणाऱ्या आंबळे, आंबी, इंदुरी, नवलाख उंबरे, वराळे, विष्णुपुरी या उप टपाल कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनी या आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

या शिबिराच्या आयोजनात सुखद होमिओपॅथिक क्लिनिक टीम सक्रियपणे सहभागी झाली होती. क्लिनिकच्या टीमने पुढेही अशा समाजोपयोगी आरोग्य उपक्रमांचे आयोजन करत राहण्याची ग्वाही दिली.

कार्यक्रमाच्या शेवटी यशवंत नगर पोस्ट ऑफिसच्या मुख्य पोस्टमास्टर श्रीमती प्रेरणा मेश्राम यांनी डॉ. सायली व त्यांच्या टीमचे मनःपूर्वक आभार मानत सांगितले की, “कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले राहणे हे आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. अशा आरोग्य उपक्रमांमुळे सकारात्मक वातावरण निर्माण होते.”

या शिबिरामुळे टपाल विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्यजागृतीचा संदेश पसरला असून, नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

प्रतिनिधी – गणेश नामदेव भेगडे (मो 9921807011)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!