Homeमहत्त्वाचेतळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दल ॲक्शन मोडवर.माॅक ड्रिल द्वारे सज्जतेची...

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दल ॲक्शन मोडवर.माॅक ड्रिल द्वारे सज्जतेची तपासणी

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दल ॲक्शन मोडवर.माॅक ड्रिल द्वारे सज्जतेची तपासणी

तळेगाव दाभाडे : आगामी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दल पूर्णपणे सज्ज झाले आहे. निवडणूक काळात कोणत्याही अनुचित घटना घडू नयेत, शांततेचे वातावरण टिकून राहावे आणि नागरिकांत सुरक्षिततेचा विश्वास निर्माण व्हावा, या उद्देशाने पोलिसांनी माॅक ड्रिल (Mock Drill) आयोजित करून तयारीची कसोटी पाहिली.

या सराव मोहिमेत देहूरोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी आणि शिरगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. माॅक ड्रिल दरम्यान दंगल नियंत्रण, जमाव व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण तसेच आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद देण्याची प्रक्रिया अंमलात आणण्यात आली.

या संदर्भात तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैयालाल थोरात म्हणाले,

“आगामी निवडणुका शांततेत, निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात, यासाठी पोलीस दल पूर्ण तयारीत आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. नागरिकांनीही पोलिस प्रशासनाला सहकार्य करून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, अशी आमची विनंती आहे.”

थोरात यांनी पुढे सांगितले की, सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांना आवश्यक दिशा-निर्देश देण्यात आले आहेत. गस्त वाढविणे, संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवणे, आणि आपत्कालीन परिस्थितीला तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी दल सज्ज ठेवणे या उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

तसेच, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आदेशानुसार निवडणुकीपूर्वी वेळोवेळी अशाच प्रकारे माॅक ड्रिलचे आयोजन करण्यात येणार आहे, जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत पोलिस दल तत्पर राहील.

तळेगाव परिसरात सध्या निवडणुकीचे वातावरण तापले असले तरी पोलिसांच्या या सक्रिय तयारीमुळे नागरिकांमध्ये दिलासा आणि विश्वास निर्माण झाला आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी पोलिस प्रशासनाच्या सज्जतेचा हा सराव म्हणजेच निवडणुकीच्या शांततेचा पाया ठरत आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!