तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत माघारीचा विस्फोट! १९ जागा बिनविरोध; नगराध्यक्षपदाची लढत तिरंगी – राजकारण तापलं
तळेगाव दाभाडे :नगरपरिषद निवडणुकीत अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी राजकीय पटावर मोठा स्फोट झाला. तब्बल ३२ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर निवडणुकीचे संपूर्ण गणितच बदलले आहे. कालपर्यंत ७ जणांनी काढता पाय घेतला होता. या धडाधडीमुळे १९ जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे स्पष्ट झाले आहे, तर उरलेल्या फक्त ९ जागांवरच खरी तलवार-तलवार मुकाबला पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, नगराध्यक्षपदाच्या लढतीने आज निर्णायक वळण घेतले. दोन उमेदवार मागे सरकल्यामुळे आता तळेगावचे भवितव्य ठरवण्यासाठी रंगणार आहे तिरंगी महासंग्राम.
महायुतीकडून संतोष हरिभाऊ दाभाडे, आणि अपक्ष म्हणून किशोर छबुराव भेगडे तसेच रंजना रघुनाथ भोसले अशी त्रिसूत्री रिंगणात ठाम उभी आहे.
बिनविरोधांची यादी – १९ प्रभागांत निवडणुकीची गरजच उरली नाही!
अर्ज माघारीनंतर खालील उमेदवार सरळ निवडून आले आहे.
प्रभाग 1अ: निखिल उल्हास भगत
प्रभाग 1ब: आशा अशोक भेगडे
प्रभाग 2ब: संदीप बाळासाहेब शेळके
प्रभाग 4अ: सिया लक्ष्मण चिमटे
प्रभाग 4ब: गणेश मोहनराव काकडे
प्रभाग 5ब: संतोष मारुती भेगडे
प्रभाग 6अ: शैलजा कैलास काळोखे
प्रभाग 6ब: अश्विनी संतोष शेळके
प्रभाग 7अ: स्नेहा आशिष खांडगे
प्रभाग 9अ: सत्यम गणेश खांडगे
प्रभाग 9ब: हेमलता चंद्रभान खळदे
प्रभाग 11अ: कमल नामदेव टकले
प्रभाग 11ब: इंद्रकुमार राजमल ओसवाल
प्रभाग 12अ: सोनाली गौरव दरेकर
प्रभाग 12ब: विनोद अशोक भेगडे
प्रभाग 13अ: शोभा सुनील परदेशी
प्रभाग 13ब: दीपक निवृत्ती भेगडे
प्रभाग 14अ: सागर निर्गुण बोडके
प्रभाग 14ब: सुरेखा निलेश भेगडे
या निकालामुळे अनेक प्रभागांमध्ये निवडणूक काय असते याचा विसर पडेल अशी स्थिती निर्माण झाली आहे!
बिनविरोधांचे पडघम वाजत असतानाच खालील ९ प्रभागांत मात्र खरा सामना रंगणार आहे:
प्रभाग 2अ – चौरंगी रणधुमाळी
विना जयंत कामत
ऋतुजा विजय काळोखे
तनुजा सुरेंद्र दाभाडे
विभावरी रवींद्रनाथ दाभाडे
प्रभाग 3अ – दुरंगी टक्कर
अनिता अनिल पवार
विना संदीप शिंदे
प्रभाग 3ब – दुरंगी सामना
सिद्धार्थ गोरख दाभाडे
विशाल साहेबराव लोखंडे
प्रभाग 5अ
आरती नितीन धोत्रे
भारती सुरेश धोत्रे
प्रभाग 7ब
चिराग सुरेश खांडगे
सुरज शंकर कदम
प्रभाग 8अ
मनीषा हनुमंत म्हाळसकर
स्नेहल संकेत म्हाळसकर
प्रभाग 8ब
अमोल जगन्नाथ शेटे
सुदाम शंकरराव शेळके
प्रभाग 10अ – पंचरंगी महाभिडंत
मजनू हनुमंत नाटेकर
सचिन सुरेश पवार
अरुण बबन माने
करुणा प्रकाश सरोदे
स्वप्नील संजय निकाळजे
प्रभाग 10ब
संगीता सतीश खळदे
सपना गिरीश करंडे
तळेगावमध्ये आता शांतता आणि तापट राजकीय वातावरण असे दोन्ही एकत्र पाहायला मिळते आहे. १९ वॉर्डांनी थेट पांढरा झेंडा दाखवला असला तरी उरलेल्या ९ वॉर्डांत होणाऱ्या लढतीतून कोणाचं नशीब उजळणार आणि कोणाच्या स्वप्नांना तडा जाणार, याकडे तळेगावचे डोळे लागले आहेत.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















